Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Nitin Gadkari : अन्य धार्मिक स्थळांच्या तुलनेत मंदिरे... गडकरींचे मोठे वक्तव्य

Nitin Gadkari : अन्य धार्मिक स्थळांच्या तुलनेत मंदिरे… गडकरींचे मोठे वक्तव्य

Subscribe

नवी दिल्ली : एकीकडे विविध मंदिरांचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ‘ड्रेस कोड’ (Dress Code For Devotees) लागू करण्याची चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. त्यांनी हिंदूंच्या मंदिरांची (Hindu temples) तुलना थेट अन्य धार्मिक स्थळांशी केली आहे.

- Advertisement -

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी राज्यातील नागपूर, अमरावती यासह विविध मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. असभ्य आणि अशोभनीय वस्त्र धारण करून येणाऱ्यांना मंदिरप्रवेशास मनाई करण्यात आली आहे. मात्र हिंदू समाजांच्या मंदिरांमध्ये असलेल्या अस्वच्छतेकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. आपल्या देशातील हिंदू समाजाच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, असे मला जाणवले. आपल्याकडे धर्मशाळा देखील चांगल्या नाहीत. मी लंडन आणि इटलीसह इतर अनेक देशांमध्ये गेलो. तेथील गुरुद्वारा, मशीद आणि चर्चचे वातावरण पाहून मला वाटले की आपली प्रार्थनास्थळेही अशीच असावीत, असे नितीन गडकरी म्हणाले. मला संधी मिळताच मी महाराष्ट्रात 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग बांधला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – ‘ड्रेसकोड’ बाबत सप्तशृंग गड ग्रामपंचायतीचं ठरलं; मंदिर ट्रस्टला दिलेल्या पत्रात म्हटले…

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बुधवारी (31 मे) एका कार्यक्रमात बोलत होते. आम्ही उत्तराखंडमधील पिथौरागढ येथून सुरू होणाऱ्या कैलास मानसरोवर मार्गाचे 80 ते 85 टक्के काम केले आहे. पूर्वी नेपाळमधून जावे लागत होते आणि यादरम्यान तापमान उणेमध्ये होते. यामुळे खूप त्रास व्हायचा, असे ते म्हणाले.

दोन Mobile app लॉन्च

राष्ट्रीय महामार्गांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने तसेच प्रवाशांना ‘प्रवास करण्याची सुलभता’ प्रदान करण्याच्या दृष्टीने दोन Mobile app ची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मंगळवारी सुरुवात करण्यात आली. यामध्ये तक्रार निवारण यंत्रणेचा समावेश असलेले ‘राजमार्गयात्रा’ (RajmargYatra) App तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अंमलबजावणीमध्ये कार्यस्थळावर लागणाऱ्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता सुलभ करणारे ‘एनएचएआय वन’ (NHAI One) App यांचा समावेश आहे.

नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील एनएचएआय अर्थात भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या बैठक झाली त्यात हे दोन Mobile app लॉन्च केले. रस्ते उभारणीतील कार्यक्षमता वाढवणे, समस्या दूर करणे तसेच अभिनव तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे या विषयांवर बैठकीत चर्चा झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग तसेच नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री, जनरल (डीआर) व्ही. के. सिंह (निवृत्त), केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सचिव अनुराग जैन, एनएचएआयचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

- Advertisment -