घरताज्या घडामोडीआर्थिक सुधारणांबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी; नितीन गडकरींकडून कौतुक

आर्थिक सुधारणांबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी; नितीन गडकरींकडून कौतुक

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. 'उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे', अशा शब्दांत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कौतुक केले आहे. ‘उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे’, अशा शब्दांत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मनमोहन सिंग यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ‘TIOL पुरस्कार २०२२’ कार्यक्रमात बोलताना गडकरींनी गौरवोद्गार काढले. (Nitin gadkari manmohan singh country economic India)

दिल्लीमध्ये ‘TaxIndiaOnline’पोर्टलने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना गडकरी यांनी मनमोहन सिंग यांचे कौतुक केले. “उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ते महाराष्ट्राचे मंत्री असताना या रस्ते प्रकल्पांसाठी निधी उभारू शकले”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

“तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी 1991 साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दाखवली”, असेही गडकरी यांनी म्हटले. शिवाय, “उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीबांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरणाद्वारे देशाचा विकास करण्यासाठी चीनचे उत्तम उदाहरण आहे. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशाला अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असेल”, असेही गडकरी यांनी म्हटले.

याशिवाय, देशभरात 26 द्रुतगती मार्ग बांधण्यात येत असल्याचेही गडकरी यांनी यावेळी म्हटले. “या एक्स्प्रेस वेमध्ये मला पैशांची कमतरता भासली नाही. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महामार्गांच्या बांधकामासाठी सर्वसामान्यांकडून पैसे गोळा करत आहे. एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या 40,000 कोटी रुपयांवरून 2014 च्या अखेरीस 1.40 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल”, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – दिल्लीसह उत्तर भारतात भूकंप, नेपाळमध्ये 6 जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -