घरट्रेंडिंग2024 च्या अखेरीस देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल; केंद्रीय मंत्री नितीन...

2024 च्या अखेरीस देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा

Subscribe

देशभराच रस्ते वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामाना करावा लागतो. तसेच, भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी तसेच, नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सरकार शर्तीच्या प्रयत्नांवर काम करत आहे.

देशभराच रस्ते वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामाना करावा लागतो. तसेच, भारतात दरवर्षी 1.5 लाखांहून अधिक लोक रस्ते अपघातात (Road Accidents) आपला जीव गमावतात. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी तसेच, नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी सरकार शर्तीच्या प्रयत्नांवर काम करत आहे. अशातच 2024 च्या अखेरपर्यंत देशातील रस्ते अपघातांची संख्या निम्म्यावर येईल, असा दावा केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. (Nitin Gadkari says that Indian government targets to reduce road accidents deaths to half by 2024)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इंदूर येथे आयोजित एका कार्यक्रमात हा दावा केला. “सरकारने महामार्गांवरील ब्‍लॅक स्‍पॉट्स संपवण्यासाठी आतापर्यंत 25 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. दर वर्षी पाच लाख रस्ते अपघातांत जवळपास 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो आणि तीन लाखाहून अधिक लोक जखमी होतात. या विषयावर सरकार गांभीर्याने काम करत आहे”, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

“2024 च्या अखेरपर्यंत आपघात आणि मृतांची संख्या 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी सरकारने योजना आखली आहे. रस्ते अपघात निम्म्यावर आणण्यासाठी सरकार महामार्गांवरील ब्‍लॅक-स्‍पॉट हटविण्याचे काम करत आहे. राष्ट्रीय महामार्गावरील 500 मीटरच्या अशा भागाला ब्लॅक-स्पॉट म्हटले जाते, जेथे 3 वर्षांत पाच रस्ते अपघात झालेले असतील, अथवा, याच काळात 10 मृत्यू झालेले असतील”, असे गडकरी यांनी म्हटले.

याशिवाय, “ब्लॅक-स्पॉट हटविण्यासाठी सरकारने आतापर्यंत 25,000 कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच, जागतिक बँक आणि आशियाई विकास बँकेच्या मदतीने सरकार 15,000 कोटी रुपयांच्या इतर प्रकल्पांवर काम करत आहे”, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – अल कायदाचा प्रमुख अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात ठार; भारताला आधीच होती हल्ल्याची पूर्वकल्पना?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -