घरदेश-विदेशपाहा गडकरी काय म्हणतायत, 'माल्ल्या घोटाळेबाज नाही!'

पाहा गडकरी काय म्हणतायत, ‘माल्ल्या घोटाळेबाज नाही!’

Subscribe

विजय माल्ल्याला भारताच्या हवाली करण्यासाठी लंडन कोर्टाने परवानगी दिली असतानाच आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विजय माल्ल्याची बाजू घेत त्याला फ्रॉड म्हणणं चूक असल्याची अजब प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पर्याय असू शकतात अशा प्रकारची चर्चा एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे नितीन गडकरी यांनी केलेल्या एका अजब वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘अशा प्रकारे एखादा आर्थिक अपराध केल्यामुळे एखाद्या व्यावसायिकाला घोटाळेबाज म्हणणं चूक आहे’, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ‘विजय माल्ल्याच्या विमान कंपनीमध्ये अडचणी आल्या होत्या, म्हणून त्याने कर्ज फेडलं नाही. पण त्यासाठी लगेच त्याला घोटाळेबाज ठरवणं योग्य नाही’, असं गडकरी म्हणाले आहेत.

आणि त्यांनी माल्ल्याची बाजू घेतली!

इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये बोलत असताना गडकरींनी विजय माल्ल्यासंदर्भात बोलताना चक्क त्याची बाजू घेतली आहे. त्यामुळे फरार झाल्यानंतर पहिल्यांदाच एखादा नेता आणि तोही राष्ट्रीय पातळीवरचा माल्ल्याच्या बाजूने बोलू लागला आहे. मात्र, माल्ल्याला भारताच्या ताब्यात देण्यासाठी नुकतीच लंडन कोर्टाने परवानगी दिलेली असताना आता तो कसा धुतल्या तांदळाचा आहे, हे सांगण्याचा नितीन गडकरींचा प्रयत्न सगळ्यांनाच खटकत आहे.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – मोदी घरी बोलवून अपमान करतात – गडकरी

माल्ल्याला मदत करायला हवी!

इकोनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. नितीन गडकरी म्हणाले, ‘४० वर्ष माल्ल्या नियमित पैसे भरत होता. व्याज भरत होता. पण जेव्हा तो एव्हिएशनमध्ये गेला (विमान व्यवसाय), तेव्हा तो अडचणीत सापडला. पण त्यामुळे तो लगेच चोर कसा झाला? ४० वर्ष व्याज भरून एकाच चुकीमध्ये तो डिफॉल्टर कसा झाला? ही मानसिकता चुकीची आहे’. याशिवाय माल्ल्याला मदक करायला हवी, असंदेखील गडकरींना यावेळी सांगितलं. ‘कोणत्याही व्यवसायामध्ये चुका या होणारच. आणि जर व्यवसाय एखाद्या जागतिक मंदीसारख्या समस्येमुळे किंवा देशांतर्गत समस्येमुळे अडचणीत आला असेल, तर त्याला आपण मदत करायला हवी,’ असं त्यांनी यावेळी सांगितलं.

एका चुकीचा सगळ्यांना अधिकार!

दरम्यान, हे सगळं बोलताना ‘विजय माल्ल्याशी माझा काहीही संबंध नाही’, असं सांगायला देखील गडकरी विसरले नाहीत. ‘विजय माल्ल्याशी माझा संबंध नसून तो जर दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण अशा प्रकारे अडचणीत आलेल्या व्यक्तीला घोटाळेबाज म्हटलं तर आपली अर्थव्यवस्थाच पुढे जाणार नाही. एका चुकीचा सगळ्यांनाच अधिकार आहे. आजकाल आपण जे म्हणतो की सगळेच चोर आहेत, हा दृष्टीकोन चुकीचा आहे’, असं ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -