राजकीय पार्श्वभूमी नसतानाही ‘त्या’ लोकांमुळे मंत्री झालो, नितीन गडकरी भावूक

Nitin Gadkari

भाजप हा घराणेशाहीचा किंवा कोणत्याही परिवाराचा पक्ष नाही तर केवळ कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्तेच नेते घडवतात असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. माझे आई-वडील आमदार, खासदार नसताना कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मंत्री झालो आहे. तसेच दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या शेजारच्या खुर्चीवर बसू शकलो असे गडकरी म्हणाले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना नितीन गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकांच्या जवळचे नेते आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी ते बोलताना भावूक झाले. वाजपेयींच्या कार्यकाळात सरकारने पिण्याचे पाणे, आरोग्य, शिक्षण आणि रस्त्ते यासारख्या मूलभूत समाजिक कल्याणकारी योजनांचा विचार करुन त्याची अंमलबजावणी केली आहे. सुरुवातीला भारतामध्ये या सुविधांचा अभाव होता असे गडकरी म्हणाले आहेत.

राजकीय पार्श्वभूमी नव्हती, आई- वडील खासदार नसल्यामुळे पाक्षाची कामे, सामान्य कार्यकर्त्यासारखे पोस्टर रंगवण्याचे आणि पार्टीसाठी प्रचाराची काम करत राहिलो परंतु भाजप कार्यकर्त्यांमुळे आज मंत्री झालो आहे अशी भावना नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान भाजप हा घराणेशाही नसलेला पक्ष असल्याचे बोलत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. भाजपमध्ये कार्यकर्ते घडवतात असा खोचक टोलाही गडकरींनी काँग्रेसला लगावला आहे. नितीन गडकरी अटल बिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमेठी येथे बोलत होते.


हेही वाचा : ‘जेव्हा नितीन गडकरी हफ्त्यावर टीव्ही घेण्यासाठी जातात’, गडकरींनीच सांगितला मजेदार किस्सा