घरताज्या घडामोडीबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आखणार विरोधकांसोबत रणनीती; 12 जून रोजी महत्त्वाची बैठक

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आखणार विरोधकांसोबत रणनीती; 12 जून रोजी महत्त्वाची बैठक

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आपापसात बैठका घेत असून, विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधकांनी सत्ताधारी मोदी सरकारला पराभूत करण्यासाठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आपापसात बैठका घेत असून, विरोधी पक्षांची एकजूट मजबूत करण्याच्या तयारीला वेग आला आहे. अशातच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधकांची बैठक घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. नितीश कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील अशीही माहिती मिळते. (nitish kumar chair opposition meeting in patna 12 june cm mamta kcr congress mallikarjuna kharge rahul gandhi)

विरोधी पक्षाची 12 जून रोजी पाटणा येथे बैठक निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील, अशी माहिती जेडीयू नेते मनजीत सिंह यांनी रविवारी दिली. या बैठकीबाबत मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती. त्यावेळी केसी वेणुगोपाल यांनी लवकरच विरोधी पक्षांची बैठक बोलविण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, या बैठकीची तारीख आणि ठिकाणबाबत माहिती दिली नव्हती.

- Advertisement -

याशिवाय नितीश कुमार यांंनी आयोजित केलेल्या विरोधकांच्या बैठकीत तृणमूल काँग्रेस प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पटना येथे 12 जून रोजी सहभागी होणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 12 जून रोजी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

या बैठकीत 20 विरोधी पक्ष सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार विरोधी पक्षांच्या ऐक्याला प्रोत्साहन देण्याच्या आपल्या अजेंड्यावर गेल्या एका महिन्यापासून देशभरातील विरोधी पक्षांची बैठक घेत होते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली आणि इतर विरोधी नेत्यांसोबत आतापर्यंत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली होती. यादरम्यान पाटणा येथे होणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीतही चर्चा झाली.

- Advertisement -

हेही वाचा – वांद्रे वर्सोवा सी-लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -