पाटणा : महिलांविषयी अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करणाऱ्या नितीश कुमार यांना विरोधकांनी चारही बाजुने घेरले आहे. अशातच मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी याप्रकरणी माफी मागितली असतानाही विरोधकांनी त्यांना नको त्या शब्दात सुनावणे सुरूच ठेवले आहे. त्यामुळे आता बिहारमधील राजकीय वातावरण कोणत्या वळणावर जाते हे पहावे लागणार आहे. (Nitish Kumar did not have to listen to that statement Apologetic yet opposition aggressive)
महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 24 तासाच्या आतच सर्व जनतेची माफी मागितली असून, मला या वक्तव्यामुळे लाज वाटत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, माफी मागण्यापूर्वी त्यांना विरोधी पक्षनेते आणि महिला आमदारांकडून ‘तुम्ही वेडा झाला आहात, लाज बाळगा, तुमचे वय झाले आहे, तुमची जाण्याची वेळ आली आहे अशा तिखट शब्दांचा सामना करावा लागला आहे.
हेही वाचा : Gram Panchayat Elections : अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाला जनतेकडून सलामी; सुनील तटकरेंची प्रतिक्रिया
महिलांविषयी केले होते वादग्रस्त वक्तव्य
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या लाजिरवाण्या वक्तव्याबद्दल आता माफी मागितली आहे. मंगळवारी (7 नोव्हेंबर) बिहार विधानसभेत लोकसंख्या नियंत्रणावर बोलताना मुख्यमंत्री नितीश यांनी महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यानंतर विरोधी पक्ष भाजप आणि महिला नेत्यांच्या प्रचंड विरोधानंतर त्यांनी आपले वक्तव्य मागे घेत माफी मागितली. मात्र, माफी मागण्यापूर्वी त्याला नको ते शब्द ऐकावे लागले.
हेही वाचा : ‘सिद्धिविनायक’ अध्यक्षपद सोडल्यानंतर आदेश बांदेकरांची भावनिक पोस्ट; म्हणाले, तो दिवस कधीही…
या शब्दांचा करावा लागला नितीश कुमारांना सामना
नितीश कुमार यांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधकांनी त्यांना त्याचं मन निस्तेज झालंय, तर कुणी म्हटलं की, वाढत्या वयामुळे ते असे बरडत असावे असे म्हटले आहे तर कुणी म्हटले की, महिलांबद्दलचा आदर त्यांच्या मनात किती आहे त्यातून दिसून येते. एका महिला आमदाराने तर ते महिलांसाठी वापरत असलेल्या शब्दांमुळे असे वाटते की त्यांना वेड लागलय. तर कुणी म्हटलंय की, ते आता मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नाहीत. त्यांचा कार्यकाळ संपला असून त्यांनी राजीनामा द्यावा, असे भाजपच्या आणखी एका आमदाराने म्हटले आहे.
विधानसभेत लागले लाज बाळगा…लाज बाळगाचे नारे
कालच्या वक्तव्यानंतर जेव्हा आज नितीश कुमार सभागृहात पोहोचले तेव्हा विरोधी पक्षनेत्यांनी गोंधळ घातला आणि घोषणाबाजी सुरू केली. भाजप नेत्यांनी नितीश कुमार, लाज बाळगा, लाज बाळगा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. हे पाहून नितीश कुमार म्हणाले, मला स्वतःची लाज वाटते, जर कोणाला माझे शब्द चुकीचे वाटले असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो आणि माझे वक्तव्य मागे घेतो. मी त्या माझ्या वक्तव्याविषयी दु:ख व्यक्त करतो. यावेळी नितीश कुमार यांच्यासमोर खुर्ची उभी करून दाखवण्यात आली.