घरदेश-विदेशजेडीयू - भाजप सरकार कोसळलं

जेडीयू – भाजप सरकार कोसळलं

Subscribe

नितीशकुमार आरजेडीसोबत पुन्हा सत्तेत

ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांत विरोधकांचे सरकार पाडून सत्तापदी बसणार्‍या भाजपला बिहारमध्ये मित्र पक्ष असलेल्या जनता दल युनायटेड (जेडीयू)नेच धक्का दिला आहे. जेडीयूने भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षासोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यपाल फागू चौहान यांच्याकडे मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करताच जेडीयू-भाजपचे सरकार कोसळले आहे. भाजपने अवघ्या महिनाभरापूर्वीच एकेकाळचा मित्रपक्ष राहिलेल्या शिवसेनेतील 40 आमदारांना फोडत महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले. इथे मात्र नितीश कुमारांनी भाजपचेच डावपेच वापरत त्यांना चितपट केले आहे. आरजेडीचे तेजस्वी यादव यांनी राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानुसार नव्या सरकारचा शपथविधी आज, बुधवार सकाळीच होण्याची शक्यता आहे.

तत्पूर्वी नितीश कुमार यांच्या घरी जेडीयूच्या खासदार आणि आमदरांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीनंतर नितीश कुमार यांनी राज्यपालांची भेट घेत राजीनामा दिला. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची नितीश कुमारांनी भेट घेतल्यानंतर राष्ट्रीय जनता दल आणि जेडीयूच्या युतीला काँग्रेसने यापूर्वीच पाठिंबा दर्शवला होता. आरजेडी प्रमुख तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यास सहमती दर्शवली आहे, तर तेजस्वी स्वतः उपमुख्यमंत्री याव्यतिरिक्त गृह खाते स्वतःकडे ठेवतील. इतकेच नाही तर सभागृहात आरजेडीचाच अध्यक्ष असेल हेदेखील निश्चित झाले आहे. नव्या सरकारची रूपरेषा जवळपास निश्चित झाली आहे, अशी माहिती आहे. जेडीयूकडे ४५ आमदार आहेत, तर आरजेडीकडे ७९ आमदार आहेत. त्यामुळे हे दोघे एकत्र आल्यास सहज सत्तास्थापन होऊ शकते. या दोघांचेही संख्याबळ १२४ होत आहे. यामध्ये काँग्रेस, कम्युनिस्ट पक्षही सहभागी होऊ शकणार आहे. हे चारही पक्ष एकत्र आल्यास महाआघाडीकडे १५५ पेक्षा जास्त संख्याबळ होत आहे.

- Advertisement -

बिहारमधील सत्तासमीकरण
विधानसभा संख्याबळ – 243
बहुमत – 122
आरजेडी – 79
भाजप – 77
जेडीयू – 45
काँग्रेस – 19
कम्युनिस्ट पक्ष – 12
एमआयएम -1
हिंदुस्थानी अवाम मोर्चा -4
इतर – 6

=नितीश कुमारांची नाराजी
=केंद्रीय मंत्रिमंडळात पुरेसे मंत्रीपद न मिळणे
=बिहारमध्ये 200 जागा मिळवण्याचा भाजपचा रोडमॅप
=जेडीयूसोबतच्या मित्रपक्षांसोबत भाजपच्या बैठका
=विधानसभा अध्यक्ष विजयकुमार सिन्हा सोबतचा उघड वाद
=आरसीपी सिंह यांची भाजपशी जवळीक
=राजीनाम्यानंतर नितीश कुमारांवर वैयक्तिक टीका
=चिराग पासवान यांना भाजपकडून मिळणारे बळ

- Advertisement -

=कोविंद यांच्या निरोप समारंभाला अनुपस्थिती
=राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या शपथविधीला गैरहजर
=नीती आयोगाच्या महत्त्वपूर्ण बैठकीला दांडी
=जातीनिहाय जनगणनेवरून आक्रमक भूमिका

महागठबंधनचा सत्तास्थापनेचा दावा
मी राज्यपालांची भेट घेऊन माझ्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. महागठबंधनमध्ये एकूण 7 पक्ष आहेत. महागठबंधनमधील सर्व पक्षांचे एकूण १६४ आमदार आहोत. या सर्व आमदारांच्या समर्थनाचे पत्र आम्ही राज्यपालांना सोपवत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कधी असेल, याची माहिती राज्यपाल देतील.
-नितीश कुमार, प्रमुख, जेडीयू

जनता धडा शिकवेल
आम्ही २०२०च्या विधानसभा निवडणुका एनडीए अंतर्गत एकत्र लढल्या होत्या. जनादेश जेडीयू आणि भाजपसोबत होता. आम्ही जास्त जागा जिंकल्यानंतरही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले. आज जे काही झाले ते बिहारच्या जनतेशी व भाजपशी विश्वासघात आहे, असे करणार्‍यांना जनता धडा शिकवेल.
– संजय जयस्वाल, प्रदेशाध्यक्ष, भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -