घरदेश-विदेश2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी केली 'ही' मोठी घोषणा

2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी नितीश कुमार यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Subscribe

नवी दिल्ली : बिहारमधील बेगुसरायमध्ये झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आज पुन्हा मीडियासमोर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी गुन्हेगारी घटनांव्यतिरिक्त इतर अनेक मुद्यांवरही चर्चा केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली. यावेळी नितीश कुमार यांनी केंद्रात सत्ता आल्यास सर्व मागास राज्यांना विशेष दर्जा दिला जाईल, अशी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी नेहमीच विशेष दर्जाची मागणी करत आलो आहे. संपूर्ण सरकारच्या वतीने करत आलोय, मी प्रत्येक बैठकीत बोललो आहे की सरकार स्थापनेची संधी मिळाली तर बिहार व्यतिरिक्त इतर मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा नक्कीच मिळेल.

सुशील मोदींना स्थान मिळाल्यास आनंदचं

मुख्यमंत्री नितीश कुमार पुढे म्हणाले की, सुशील मोदीजींना स्थान मिळाल्यास आम्हाला आनंद होईल, जरी ते रोज बोलत नसले तरी… तेही मोदी आहेत, पण त्यांना कुठे जागाच मिळाली नाही. त्यामुळे आजही बोलत राहिल्यास पंतप्रधान मोदी सुशील मोदींची जागा घेतील.

- Advertisement -

नितीश कुमार पुढे म्हणाले की, महिलांच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या विकासासाठी बिहारला विशेष दर्जा मिळावा.
आम्ही विकासकामे करत आहोत. गावोगावी पथदिवे बसवले जात आहेत. जेव्हा रात्री अंधार असतो, तेव्हा सौर पथदिव्यांचा प्रकाश असेल तर खूप छान होईल. आम्हाला विशेष दर्जा मिळाला असता तर आम्ही आणखी पुढे गेलो असतो, महिला आणि गरिबांच्या उन्नतीसाठी हे आवश्यक होते. असेही मुख्यमंत्री म्हणाले.


वेदांता प्रकल्प गुजरातला जाणे हे दुर्दैव; तळेगाव हीच योग्य जागा : शरद पवार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -