घरताज्या घडामोडीफिर एक बार, नितीश कुमार! सातव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री!

फिर एक बार, नितीश कुमार! सातव्यांदा झाले बिहारचे मुख्यमंत्री!

Subscribe

नुकत्याच संपलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपपेक्षा कमी जागा मिळूनही संयुक्त जनता दल अर्थात जदयुच्या नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तब्बल सातव्यांदा नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यात हा त्यांचा सलग चौथा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होता. पाटण्यामध्ये असलेल्या राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, बिहारचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांनी नितीश कुमार यांना राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तारकिशोर प्रसाद आणि रेणू राय यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

बिहार विधानसभा निवडणुकांची मतमोजणी झाल्यानंतर राज्यात तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल अर्थात राजद पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला. राजदला तब्बल ७५ जागा मिळाल्या. त्याखालोखाल भाजप (७४), जदयु (४३), काँग्रेस (१९), डावे पक्ष (१६) आणि इतर ८ असा बिहारच्या २४३ जागांचा निकाल लागला. त्यापैकी जदयु आणि भाजपची आघाडी असल्यामुळे आघाडीच्या वतीने नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एनडीएला १२५ तर महागठबंधनला ११० जागा जिंकता आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -