घरताज्या घडामोडीमाझ्याविरोधात बोललात तरच पुढे जाल, नितीश कुमारांचा भाजपला टोला

माझ्याविरोधात बोललात तरच पुढे जाल, नितीश कुमारांचा भाजपला टोला

Subscribe

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या चर्चेदरम्यान भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर जोरदार निशाणा साधला. अटलबिहारी वाजपेयी यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, भाजप पूर्वीसारखी राहिलेली नाहीये. आता भाजपमध्ये असे लोक आहेत जे कोणतेही काम करत नाहीत, फक्त खोटा प्रचार करतात. विधानसभेत बसलेल्या भाजपच्या आमदारांना त्यांनी आपल्या विरोधात खूप बोलायला सांगितले. माझ्याविरोधात बोललात तरच पुढे जाल, असं म्हणत नितीश कुमार यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला आहे.

नितीश कुमार यांनी भाजपच्या आमदारांना सांगितले की, स्थानिक नेत्यांबद्दल माझी कोणतीही तक्रार नाही. नंदकिशोर यादव यांना अध्यक्ष करण्यात येईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते, मात्र ते झाले नाही. 2005 मध्ये काय मतदान झाले? 2020 च्या निवडणुकीत माझ्या विरोधात कोणाला उभे केले होते?, असा सवाल नितीश कुमार यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण भाजपने दबाव टाकत बनवले. तसेच त्यांचे जुने सहकारी आरसीपी सिंग यांचे नाव न घेता कुमारांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. तारकिशोरबद्दल नितीश कुमार म्हणाले की, बोलत राहा. तुम्ही बोलाल तरच दिल्लीची जनता लक्ष देईल. जेव्हा आम्ही भाजपसोबत महाविकास आघाडीत नव्हतो. तेव्हासुद्धा आपण रोज भेटायचो. जे विरोधात बोलणार त्यांना त्यांची जागा कळेलच, असं नितीश कुमार म्हणाले.


हेही वाचा : बिहारमध्ये ‘महागठबंधन’ सरकारला ग्रीन सिग्नल, नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -