घरदेश-विदेशनीतीश कुमार यांचे ७ नंबरचे कनेक्शन

नीतीश कुमार यांचे ७ नंबरचे कनेक्शन

Subscribe

बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीएच सरकार येणार आहे, पण मुख्यमंत्री पदाची माळ मात्र सुशासन बाबू म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नीतीश कुमार यांच्याच गळ्यात पडणार आहे. महागठबंधनला मात देताना एनडीएने चमकदार कामगिरी केली. बिहारच्या निवडणुकीत भाजप सर्वात यशस्वी आणि मोठा पक्ष म्हणून जरी उदयास आलेला असला तरीही मुख्यमंत्रीपदी मात्र नीतीश कुमार यांचीच वर्णी लागली आहे.

बिहारमध्ये मुख्यमंत्री पदाची गादी सातव्यांदा सांभाळण्यासाठी नितीश कुमार पुन्हा एकदा सज्ज होत आहे. नीतीश कुमार यांच्याशी आकड्यांचा खेळ पाहिला तर नीतीश कुमार यांना ७ क्रमांक खूपच लकी ठरलेला आहे. निवडणुकीचा निकाल असो वा जन्मतारीख नीतीश कुमार यांच्याशी संबंधित अनेक आकड्यांमध्ये ७ क्रमांकाचा योगायोग आढळलेला आहे.

- Advertisement -

म्हणूनच ७ क्रमांक लकी
– बिहारचे सुशासन बाबू सध्या वयाच्या ७० व्या वर्षी मुख्यमंत्री होत आहेत. त्यांचा जन्म १ मार्च १९५१ रोजी झाला
– नीतीश हे सातव्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. सर्वात पहिल्यांदा त्यांनी २००० साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर २००५, २०१०, २०१५, २०१७ मध्ये शपथ घेतली आहे.
– यावेळी निवडणूकीचा निकालही ७ क्रमांकाशी जोडला गेला आहे. यंदा १० नोव्हेंबर २०२० रोजी निकाल जाहीर झाला. या तारखेची बेरीजही ७ होते.
– यावेली जनता दल युनायटेडने ४३ ठिकाणी यश मिळवले. या ४३ आकड्याची बेरीजही ७ होते
– येत्या १६ तारखेला नीतीश मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, या शपथविधीची तारीख १६ नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे. याचा बेरजेचा आकडाही ७ होतो

नीतीश कुमार यांनी यंदाच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट केले होते की ही निवडणुक ही माझ्यासाठी शेवटची निवडणूक असणार आहे. तसेच सर्वेक्षणातही नीतीश कुमार यांचा पराभव होईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. अनेक वर्षे सरकारमध्ये असल्याने एंटी इनकंबेसीचा फॅक्टरही नीतीश कुमार यांच्या बाबतीत वर्तवण्यात आला होता. पण भाजपच्या मदतीने विजयश्री खेचून आणतानाच नीतीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली आहे. आता खुद्द नरेंद्र मोदी यांनीच नीतीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केल्याने नीतीश कुमार यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -