मौलाना सादचा तबलीगींना संदेश, म्हणे सरकारला सहकार्य करा!

nizamuddin markaz maulana saad audio message to tablighi jamaat support the government necessary to cure the coronavirus covid 19 disease
मौलाना सादचा तबलीगींना संदेश, म्हणे सरकारला सहकार्य करा!

दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये राहणारे तबलीग जमातचे प्रमुख मौलाना साद हे पोलिसांच्या समोर येत नाही आहेत. परंतु आपल्या अनुयायांमध्ये ऑडिओच्या माध्यमातून मेसेज देत आहे. मौलान साद यांनी त्यांच्या अनुयायांसाठी ऑडिओ मेसेज जारी केला आहे. या मेसेजमध्ये तबलीग जमातच्या लोकांना सांगितलं आहे की, कोणत्याही आजारावर उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. जिथे कुठे तुम्ही आहात, तिथे सरकारला पूर्ण सहकार्य करा. उपारासाठी शासनाचे अधिकारी आणि संबंधित डॉक्टर जिथे घेऊन जातात तिथे त्यांच्यासोबत जा आणि सहकार्य करा.

पुढे ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले की, सर्व वाईट आणि चांगल्या परिस्थितीचा मालिक अल्लाह आहे. जगातील सर्व परिस्थितीवर अल्लाहाचे आदेश येत असतात. मानवाच्या कर्मामुळे प्रत्येक परिस्थिती उद्भवत असते. जशी आपली कर्मे तशी आपल्यावर परिस्थिती येत. संपूर्ण दुनिया या महामारीची शिकार झाली आहे. आपल्या बिघडलेल्या कर्मामुळेच महामारी झाली आहे. जेव्हा माणूस आपल्या अल्लाहपासून दूर जातो तेव्हा अल्लाह अशी परिस्थिती निर्माण करतो की माणूस जवळ येता.

यापूर्वी देखील मौलाना साद यांचा ऑडियो युट्यूब चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांनी जनता आणि सरकारने एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे असा मेसेज दिला होता. तरच देशातील प्रगती होती. तसंच परिस्थितीनुसार गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले होते. कोणताही शेजारी भुकेला राहिला नाही पाहिजे. जेव्हा आपण एकमेकांशी सहानुभूतीपूर्वक वागतो तेव्हा निर्माणकर्ता आपल्या कृपादृष्टी दाखवतो.


हेही वाचा – मरकजचे प्रमुख मौलाना सादवर ईडीने केला गुन्हा दाखल