RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना दिलासा नाही, रेपो रेट पूर्वीप्रमाणेच; रिझर्व्ह बँकची घोषणा

no changes in repo rate shaktikanta das rbi monetary policy
RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना दिलासा नाही, रेपो रेट पूर्वीप्रमाणेच; रिजर्व बँकची घोषणा

भारतीय रिझर्व्ह बँकने आज आपल्या पतधोरण आढाव्याचा निकाल जाहीर केला आहे. यामध्ये सलग ९ व्यांदा व्याज दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याप्रमाणे आता रेपो रेट ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ३.३५ टक्के असे पूर्वीप्रमाणेच असणार आहेत. याबाबतची घोषणा आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेत केली.

आरबीआय गर्व्हनर काय म्हणाले?

आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, कोरोना महामारीमुळे जागातिक बाजारात खूप आव्हाने आहेत आणि त्यात भारतासमोर देखील खूप आव्हाने आहेत. याचा सामना करण्यासाठी आरबीआय महत्त्वाची भूमिका निभावण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता आपण कोरोनासोबत लढण्यासाठी पहिल्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत आहोत.

इतर दरांवर आरबीआयने काय केले?

मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) आणि बँक दरांमध्ये कोणताही बदल न करण्याची घोषणा करत आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, देशात अजूनही खासगी गुंतवणुकीला गती देण्याची गरज आहे. देशातील काही भागांमध्ये आलेल्या आपत्तीचा परिणाम राज्यातून येणाऱ्या महसुलीवर झाला आहे.

GDPवर आरबीआय काय म्हणाले?

आर्थिक वर्ष २०२२मध्ये आर्थिक विकास दर ९.५ टक्के राहू शकतो. सध्याची परिस्थिती पाहून म्हटले जाऊ शकते की, भारतीय अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे आणि देश कोरोनासोबत लढण्यासाठी चांगल्या स्थितीत आहे.

दरम्यान आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, ओमिक्रॉन व्हेरिएंट आल्यामुळे परिस्थिती अनुकूल नाही आहे. पण आरबीआय आर्थिक स्थिरता ठेवण्यासाठी लिक्विडिटीमध्ये कमी होऊ देणार नाही. सिस्टम लिक्विडिटी कमी होऊ देणार नाही. एमपीसीच्या ६ पैकी ५ सदस्यांचे मत एक होते. ज्याच्या आधारे आज पतधोरणात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा – 2 Thousand RS Note: २ हजारच्या नोटा बाजारातून गायब, संसदेत मोदी सरकारने दिली माहिती