घरदेश-विदेशरामसेतूच्या अस्तित्वाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नाही; केंद्राने संसदेत दिली माहिती

रामसेतूच्या अस्तित्वाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नाही; केंद्राने संसदेत दिली माहिती

Subscribe

भारत आणि श्रीलंकेदरम्यान समुद्रात बांधलेल्या कथित रामसेतूच्या मुद्द्यावरून सोमवारी राज्यसभेत सविस्तर चर्चा झाली. याबाबत केंद्र सरकारनेही संसदेत सविस्तर उत्तर दिलं आहे. रामसेतूच्या अस्तित्वाबाबत कोणताही अधिकृत पुरावा नाही, असं केंद्र सरकारने जाहीर केलं आहे. याबाबत प्राचीन द्वारका आणि अशा प्रकरणांची चौकशीसाठी सरकार सातत्याने काम करत असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली आहे.

हरियाणाचे अपक्ष खासदार कर्तिकेय शर्मा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला की, आधीच्या सरकारने इतिहास या विषयाला महत्त्व दिलं नाही. त्यामुळे आमच्या गौरवशाली इतिहासावर आत्ताचे सरकार काही वैज्ञानिक संशोधन करतंय का?… कार्तिकेय शर्मा यांच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिले. तसेच रामसेतूच्या अस्तित्वाबाबतही महत्त्वाची माहिती दिली.

- Advertisement -

या मुद्द्यावर उत्तर देत जितेंद्र सिंह म्हणाले की, आमच्या खासदाराने रामसेतूच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला याबाबत आनंद आहे. पण हा 18000 वर्षांचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत आपल्या काही मर्यादा आहेत. आपण ज्या पुलाबद्दल बोलतोय तो 56 किलोमीटर लांब होता. यात स्पेस टेक्नोलॉजीमार्फत शोध घेतला त्यावेळी समुद्रात काही दगड दिसून आले, त्या दगडांची एक अशी आकृती आहे, जी त्यामध्ये सातत्य दाखवते. तसेच समुद्रात काही बेटे आणि चुनखडीसारख्या गोष्टीही सापडल्या आहेत. स्पष्ट शब्दात सांगायचे झाल्यास रामसेतूचं खरं रूप तिथे आहे की नाही हे सांगणं कठीण आहे. दरम्यान अशी काही चिन्हं आहेत जी सूचित करतात की, तिथे एक रचना अस्तित्वात असू शकते.

भाजपने रामसेतूचे अस्तित्व मान्य नसल्याचा आरोप करत काँग्रेसवर सातत्याने निशाणा साधला होता. मात्र आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेतील उत्तरात काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विटरवर सरकारचे उत्तर शेअर करत लिहिले की, सर्व भक्तांनो उघड्या कानांनी ऐका आणि उघड्या डोळ्यांनी पाहा, मोदी सरकार संसदेत म्हणतंय की, रामसेतूच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही.

- Advertisement -

भारतातील रामेश्वरम आणि मन्नार बेट यांच्यामध्ये चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. भारतात या साखळीला रामसेतू म्हणून ओळखले जाते. या पुलाची लांबी सुमारे 30 मैल (48 किमी) इतकी आहे. या भागांत समुद्र उथळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या बोटी आमि जहाजं चालविण्यात अडचणी येतात. सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी श्रीरामानं हा सेतू बांधला, अशी एक पौराणिक कथा या पुलामागे सांगितली जाते. वानरांच्या फौजेने रावणाच्या लंकेत पोहोचण्यासाठी दगडांवर ‘श्रीराम’ नाव लिहून ते दगड पाण्यात सोडले. ज्यामुळे हे दगड पाण्यावर तरंगले. यानंतर सर्व वानरांनी सगळ्या दगडांवर श्रीराम लिहून ते पाण्यात टाकले, आणि लंकेपर्यंत जाण्यासाठी पूल बांधला, अशी पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे.


सरकारला SIT स्थापन करण्याची खाज, आधी 50 खोक्यांसाठी SIT स्थापन करा; संजय राऊतांची जहरी टीका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -