(No-Confidence Motion Rejected) नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी गुरुवारी फेटाळला. त्यात गंभीर त्रुटी असून उपराष्ट्रपतींच्या प्रतिष्ठेला धक्का लावण्यासाठी अतिशय घाईघाईने ही कृती करण्यात आल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे. (The opposition spelled the Vice President’s name wrong)
अविश्वास प्रस्तावासंबंधी विरोधकांनी दिलेल्या नोटिशीमध्ये अनेक त्रुटी उपसभापती हरिवंश यांनी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ही नोटीस असंबंद्धरीत्या तयार करण्यात आली होती. त्यात काही चुकासुद्धा होत्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तीला ही नोटीस दिली आहे, त्या व्यक्तीच्या नावाबद्दल कोणतीही माहिती त्यात नाही. एवढेच नाही तर, संपूर्ण याचिकेत उपराष्ट्रपतींच्या नावाचे स्पेलिंगही चुकीचे आहे. तसेच, संबंधित कागदपत्रेही जोडलेली नव्हती. हे केवळ मीडिया रिपोर्ट्सच्या आधारे तयार करण्यात आले होते. केवळ सभापतींची मलीन करण्याच्या उद्देशानेच ही नोटीस तयार करण्यात आली होती, हेच धक्कादाय असल्याची टिप्पणी उपसभापती हरिवंश यांनी केली आहे.
हेही वाचा – BJP vs Congress : भाजप म्हणजे नाट्यशाळा; संसदेत झालेल्या राड्यावर काय म्हणाले राऊत?
दुसऱ्या क्रमांकाच्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात केवळ नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांनी हा प्रस्ताव आणला असून नोटिशीचे प्रारूपही योग्य नसल्याचे सांगत उपसभापती हरिवंश यांनी ही नोटीस फेटाळली. शिवाय, घटनेच्या कलम 90(C) नुसार कोणताही प्रस्ताव आणण्यासाठी 14 दिवस अगोदर नोटीस द्यावी लागते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
विरोधी पक्षाच्या खासदारांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नाही. त्यांचा माइकही बंद केला जातो, ही पक्षपाती भूमिका आहे, असे सांगत विरोधकांनी राज्यसभेच्या सरचिटणीसांकडे अविश्वास ठरावासंदर्भातील नोटीस सादर केली. एकूण 60 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे, भारताच्या संसदीय इतिहासात उपराष्ट्रपतींविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी यावेळी पहिल्यांदाच झाली होती. यावर जगदीप धनखड यांनी प्रतिक्रियादेखील दिली होती. माझ्याविरोधात हा प्रस्ताव आणण्यात आल्याने मी दुःखी आहे. विरोधकांना माझ्याविरोधात प्रस्ताव आणण्याचा अधिकार आहे. पण, माझ्याविरोधात अभियान म्हणून याचा वापर होऊ नये, असेही ते म्हणाले होते. (No-Confidence Motion Rejected: The opposition spelled the Vice President’s name wrong)
हेही वाचा – Raj Thackeray on Kalyan Incident : …ही तुमची लाडकी बहीण नाही का? राज ठाकरेंचा महायुतीला सवाल