नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वादळी घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या लोकसभा सभागृहात पोहल्यानंतर विरोधकांकडून चांगलाच घोषणाबाजी करत गदारोळ करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून केलेली टिप्पणी चांगलीच व्हायरल होत असून, त्यांनी महाभारतातील हस्तीनापूर आणि आताचे मणिपूर असा सहसंबंध जोडत पंतप्रधानाना घेरण्याचा प्रयत्न केला.
लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपली बाजू मांडली. ते म्हणाले की, यापूर्वी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार नव्हता. मात्र पंतप्रधानांना सभागृहात आणण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर वक्तव्य करावे अशी आमची इच्छा होती. अधीर रंजन चौधरी यांनी पुढे मणिपूरच्या खासदारांना बोलू का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
एनडीए सरकारविरोधात विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदी लोकसभेत पोहोचले. लोकसभेत पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आपली बाजू मांडली.
हस्तीनापूर आणि मणिपूरमध्ये काही फरक उरला नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या सभागृहात उपस्थित असताना कॉंग्रेसचे नेते अधिरंजन चौधरी यांनी मणिपूरवरुन मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, पूर्वी अविश्वास प्रस्ताव आणण्याची कल्पना नव्हती. पण, पंतप्रधानांना सभागृहात आणण्यासाठी अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर वक्तव्य करावे अशी आमची इच्छा होती. पण त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. तेव्हा त्यांनी महाभारताचा दाखल देत धृतराष्ट्र आंधळा असताना द्रौपदीचे कपडे काढून घेण्यात आले होते, आजही राजा आंधळाच बसला आहे. मणिपूर हस्तिनापुरात काही फरक उरला नाही असे म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
हेही वाचा : रेल्वे हत्याकांडातील आरोपीबद्दल ओवैसींचा पंतप्रधान मोदींना प्रश्न, म्हणाले – “तो तुमचा…”
मणिपूरवरुन खासदारांना बोलू दिले जात नाही
अधीर रंजन चौधरी पुढे म्हणाले की, मणिपूर विषयावरून खासदारांना बोलू का दिले जात नाही, असा प्रश्न उपस्थित करत मणिपूरमध्ये बफर झोन का निर्माण करण्यात आला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. बफर झोन तयार करणे म्हणजे तुम्ही मणिपूरचे विभाजन केले आहे असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा : No-Confidence Motion : राहुल गांधी मणिपूरवर असे काय बोलले की ‘ते’ शब्द काढावे लागले? वाचा-
संसदीय कामकाज मंत्र्यांकडून आक्षेप
अधीर रंजन चौधरी यांच्या उत्तरावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतला. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, पंतप्रधान कार्यालयाचा आदर केला पाहिजे आणि काँग्रेस नेत्याने आपल्या शब्दाबद्दल माफी मागितली पाहिजे.