नवी दिल्ली : सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात वादळी घडामोडी होत असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या लोकसभा सभागृहात पोहल्यानंतर विरोधकांकडून चांगलाच घोषणाबाजी करत गदारोळ करण्यात आला. दरम्यान विरोधकांनी सध्या सभात्याग केला आहे. दरम्यान काल राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्या भाषणात मणिपूरवरुन सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला होता. मात्र आता त्यांच्या त्या भाषणातील काही विधानावर कात्री लावण्यात आली असून, काही शब्द संसदेच्या पटलावरून काढण्यात आले आहेत.
संसदेचे सदस्यत्व बहाल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पहिल्यांदाच लोकसभेत पोहोचले. येथे त्यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आणि भारत मातेच्या हत्येबाबत वक्तव्य केले. हे भाषण संसद टीव्हीवर कमी दाखवल्याचा आरोप करीत काँग्रेसने सरकारला घेराव घातला होता. आता मात्र राहुल गांधी यांच्या भाषणातील काही वादग्रस्त शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले आहेत.
संसदेत दोन दिवसांपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. गुरुवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते आमनेसामने दिसले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले आणि जोरदार हल्ला चढवला. मणिपूरमध्ये ‘भारत मातेची हत्या’ या राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाजपने घेराव घातला आहे. राहुल गांधी यांच्या भाषणातील वादग्रस्त शब्द लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा : Imran Khan : पंतप्रधानपदावरून हटवण्यासाठी अमेरिकेकडून अल्टिमेटम; पाकिस्तानच्या कागदपत्रातून खुलासा
राहुल गांधींनी या शब्दात साधला होता मोदींवर निशाणा
खासदार राहुल गांधी यांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकावर जोरदार शाब्दिक हल्ला केला. ते म्हणाले होते की, मणिपूर या राज्यात भारत मातेची हत्या झाली आहे. भारतमातेची हत्या करणारे लोक हे देशद्रोही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरचा दौरा करत नाहीत कारण त्यांना मणिपूर हे भारतात आहे हेच मान्य नाही. तुम्ही (सत्ताधारी) देशद्रोही आहात, देशप्रेमी नाही. तुम्ही भारतमातेचे खुनी आहात म्हणूनच तुम्ही मणिपूरला जात नाही. भारतमाता ही माझी माता आहे. माझी एक आई इथे संसदेत बसली आहे तर माझी दुसरी आई म्हणजे भारतमाता आहे. तिची तुम्ही मणिपूरमध्ये हत्या केली. आज वास्तव हे आहे की मणिपूरमध्ये तुम्ही विभाजन केलं आहे. मणिपूरमध्ये तुम्ही केरोसीन शिंपडलं आणि तसंच देशाच्या इतर राज्यांमध्येही तुम्हाला केरोसीनच शिंपडायचं आहे असंही राहुल गांधी यांनी असे म्हटले होते.
हेही वाचा : No-Confidence Motion : NDA तील ‘हा’ घटक पक्ष अविश्वास प्रस्तावाचे करणार समर्थन
12 शब्दांना कात्री
राहुल गांधी यांच्या संसदेतील भाषणावर सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतल्यांनतर त्यांच्या भाषणातील खून, मर्डर, देशद्रोही, खुनी असे एकूण त्यांच्या भाषणातले 12 शब्द संसदेच्या कामकाजातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चुकीचे शब्द काढण्याची अनेक वर्षांची परंपरा
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी बाबत खुलास केला असून,ते म्हणाले की, संसद टीव्ही आमच्या हातात नाही. स्पष्टीकरणाचे काम खुर्चीद्वारे केले जाते. काही असंसदीय असेल तर असे शब्द कधीही काढून टाकले जातात. ही प्रक्रिया अनेक दशकांपासून सुरू आहे. असा कोणताही नवा नियम आम्ही केलेला नाही.