घरदेश-विदेशकाबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांची माहिती

काबुलहून भारतात परतलेल्या ७८ जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांची माहिती

Subscribe

अफगाणिस्तानने तालिबावर ताबा मिळताच त्या देशात अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणी नागरिक तालिबानच्या हुकूमशाही राजवटीमुळे देश सोडण्यासाठी धडपड करत आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानमधून नागरिकांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचवेळी मंगळवारी ७८ नागरिकांना हवाई मार्गे भारतात आणण्यात आले. या ७८ नागरिकांपैकी जवळपास १६ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याची माहिती समोर आली होती, मात्र या सर्व नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे स्पष्टीकरण आज इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी दिले आहे. (ITBP) भारतात आलेल्या या सर्व नागरिकांना आता क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दिल्लीतील छावला कॅम्प येथील आयटीबीपीच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये या ७८ नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. अशी माहितीही इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी ट्वीट करत जाहीर केली.

काबुल विमानतळावर अडकलेल्या नागरिकांना भारतीय हवाई दलाच्या विमानाने आणले जात आहे. यामध्ये भारतीय नागरिकांसह अफगाणी नागरिकांचाही समावेश आहे. यात मंगळवारी ७८ नागरिकांना भारतात आणण्यात आले.

- Advertisement -

तर भारताने आत्तापर्यंत ५०० अधिक नागरिकांची अफगाणिस्तानातून सुटका केली आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही काबूलमधून भारतात सुखरुप आणण्यात आले. दररोज दोन विमानांच्या मदतीने नागरिकांना भारतात आणले जात आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता सर्व नागरिकांना क्वारंटाईन ठेवत त्यांची चाचणी केली जात आहे.

- Advertisement -

अफगाणी नागरिकांना आता केवळ E-VISA वरच मिळणार भारतात प्रवेश, MHA चा निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -