घरCORONA UPDATEकोरोनावरील लस २०२१ मध्ये अपेक्षित; ICMR च्या विश्वासावर विज्ञान मंत्रालयाचे पाणी

कोरोनावरील लस २०२१ मध्ये अपेक्षित; ICMR च्या विश्वासावर विज्ञान मंत्रालयाचे पाणी

Subscribe

संपुर्ण जगाला ज्या कोरोना व्हायरसने वेठीस धरले आहे. या व्हायरसला मात देण्यासाठी जगभरात १४० लसींपैकी ११ लस मानवी चाचणीसाठी तयार असून यापैकी दोन लस या स्वदेशी आहेत. याचाच आधार घेत देशात १५ ऑगस्ट रोजी कोरोनावरील प्रभावी ठरणारी लस वापरात आणली जाईल, असा दावा ICMR ने केला होता. मात्र दाव्यातील हवा विज्ञान मंत्रालयाने काढली आहे. कोरोनावरील कोणतीही लस २०२१ पूर्वी वापरात आणता येणार नाही, असे स्पष्टीकरण विज्ञान मंत्रालयाने दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच ICMR ने काही रुग्णालयांना स्वदेशी लसींच्या क्लिनिकल ट्रायल घेण्याची प्रक्रिया सुरु करण्याचे निर्देश दिले होते. १५ ऑगस्ट पासून या लस वापरता येतील, असा दावा केला गेला होता. त्यानंतर औषध आणि मेडिकल क्षेत्रातील अनेक नामवंतानी या दाव्यावर शंका उपस्थित केली होती. जगभरात मानवी चाचणीसाठी ११ लस तयार आहेत. यापैकी दोन लस भारतात तयार करण्यात आल्या आहेत. ICMR आणि भारत बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमाने एक लस तयार केली असून दुसरी लस झायडस कॅडिलाने बनविली आहे. त्यापैकी आयसीएमआरची कोव्हॅक्सीन ही मानवी चाचणीसाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

१५ ऑगस्ट रोजी कोरोनावरील लस वापरात येणार असल्याची बातमी आल्यानंतर विरोधकांनी यावर सवाल उपस्थित केले होते. कोरोनाची लस वापरण्याची घिसाडघाई केली जात असल्याचा आरोप माकप नेते सीताराम येच्युरी यांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -