घरताज्या घडामोडीचीनमध्ये भारतीय नाविकांना 'नो एन्ट्री', हजारो कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड

चीनमध्ये भारतीय नाविकांना ‘नो एन्ट्री’, हजारो कर्मचाऱ्यांवर कोसळणार बेकारीची कुऱ्हाड

Subscribe

गेल्या अनेक महिन्यांपासून चीनमधील जवळपास २० हजार भारतीय नाविकांना बरोजगार होऊन घरी बसावे लागले

चीनमध्ये काम करत असलेल्या भारतीय नाविकांची कामे सध्या धोक्यात आली आहेत. चीनमध्ये भारतीय नाविकांना येण्यास बंदी घातली आहे. अखिल भारतीय नाविक संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी असा आरोप केला आहे की, भारतीय चालक असलेल्या जहाजांना चीन आपल्या सीमाभागात प्रवेश नाकारत आहेत. यामुळे तिथल्या नाविकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्यात. संघाने सकारकडून यासंदर्भात मदतीची हाक दिलीय. (‘No entry’ to Indian sailors in China, thousands of workers unemployed)  सरकारने मदत केली नाही तर येथे काम करणारे हजारो लोक बेरोजगार होतील. कर्मचारी संघाने केंद्र सरकारला या प्रकरणात हस्तक्षेप करुन हजारो भारतीय नाविकांना वाचवण्यासाठी मदत मागितली आहे. त्यानुसार, वरिष्ठ सराकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चीनकडून अद्याप कोणताही अधिक माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

चीनला जाणाऱ्या जहाजांसाठी कंपनी कोणत्याही नवीन नाविकांची भर्ती करत नाहीये. चीन असे का करत आहे याबाबत चीनने कोणताही माहिती दिली नसल्याचे नाविकांनी सांगितले आहे. संघटनेने बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनेवाल यांना एक पत्र लिहित असा दावा केला आहे की, जवळपास २० हजार नाविकांना पुढील काळात घरी बसावे लागणार आहे.  मार्च २०२१ पासून कोणतेही जहाज भारतीय कर्मचाऱ्यासोबत चीनच्या बंदरात पोहचले तर चीन सरकार त्या जहाजाला बंदरात येण्यास परवानगी देणार नाही. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चीनमधील जवळपास २० हजार भारतीय नाविकांना बरोजगार होऊन घरी बसावे लागले आहे.

कर्मचारी संघाच्या या पत्राच्या प्रती विदेष मंत्रालय आणि क्षेत्र नियामक, शिपिंग डायरेक्टर जनरलला पाठवण्यात आल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, अधिकांऱ्यांचे असे म्हणणे आहे की, त्यांना चीन सरकारकडून यासंदर्भात कोणतीही अधिक माहिती मिळालेली नाही. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, शिपिंग डायरेक्टर अमिताभ कुमार यांनी असे देखील चीन सरकारकडून विदेश मंत्रालयाला देखील कोणताही माहिती देण्यात आलेली नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – covid19: तिसऱ्या लाटेला थोपण्यासाठी Vaccination पुरेसे नाही, आरोग्य तज्ञांचा अलर्ट

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -