घरदेश-विदेशसामूहिक राजीनामे नको, हस्तलिखित स्वरुपात द्या, पाकिस्तानातील पीटीआयच्या खासदारांना सूचना

सामूहिक राजीनामे नको, हस्तलिखित स्वरुपात द्या, पाकिस्तानातील पीटीआयच्या खासदारांना सूचना

Subscribe

इस्लामाबाद : माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या खासदारांनी सामूहिक राजीनामे दिले होते. पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांनी हे सर्व राजीनामे फेटाळले. प्रत्येक सदस्याला वैयक्तिकरित्या हस्तलिखित स्वरुपात राजीनामे द्यावे लागतील, या भूमिकेचा अध्यक्षांनी पुनरुच्चार केला आहे.

पाकिस्तान नॅशनल असेंब्लीच्या नियमांनुसार पडताळणीसाठी केवळ हस्तलिखित राजीनामा स्वीकारला जाऊ शकतो. राजा परवेझ अश्रफ यांनी गुरुवारी पीटीआयच्या शिष्टमंडळाला सांगितले की, संविधानानुसार राजीनामे वैयक्तिकरित्या स्वीकारले जाऊ शकतात, सामूहिक नाही, असे वृत्त द न्यूज इंटरनॅशनलने दिले आहे.

- Advertisement -

नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष असद कैसर यांच्या नेतृत्वाखाली पीटीआयच्या शिष्टमंडळाने गुरुवारी अध्यक्ष राजा परवेझ अश्रफ यांची पाकिस्तानी संसद भवनात भेट घेतली. पीटीआय खासदारांचे राजीनामे संविधान तसेच नॅशनल असेंब्लीच्या कामकाजाच्या नियमानुसार आणि कार्यपद्धतीनुसारच स्वीकारले जाऊ शकतात, असे अश्रफ यांनी स्पष्ट केले.

नॅशनल असेंब्लीचे उपअध्यक्ष कासिम खान सूरी, पीटीआयचे मुख्य प्रतोद मलिक अमीर डोगर, अताउल्ला खान, अमजद खान नियाझी, नियाज अहमद जाखर, डॉ. शब्बीर हुसेन कुरेशी, फहीम खान, लाल चान मलाही आणि ताहिर हे अध्यक्षांबरोबरच्या बैठकीत उपस्थित होते.

- Advertisement -

उपअध्यक्ष कासिम सूरी यांनी स्वीकारलेले राजीनामे घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहेत, असे पीटीआयच्या शिष्टमंडळाशी बोलताना राजा परवेझ अश्रफ म्हणाले. वृत्तपत्रांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार, संवाद आणि राजकीय सलोख्यासाठी नेहमीच जागा असते यावर त्यांनी भर दिला. सध्याच्या घडीला पाकिस्तानसमोरील आव्हाने सोडवण्यासाठी राजकीय सहमती महत्त्वाची आहे, असेही त्यांनी म्हटल्याचे सांगण्यात येते.

एक्स्प्रेस ट्रिब्यूनने राजा परवेझ अश्रफ यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, हे राजीनामे पीटीआयच्या खासदारांनी लिहिलेले नाहीत. शेवटच्या समन्सवरही पीटीआयचे सदस्य आले नाहीत. विशेष म्हणजे, पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांना अविश्वास प्रस्तावाद्वारे पंतप्रधानपदावरून हटवल्यानंतर दोन दिवसांनी 11 एप्रिल रोजी नॅशनल असेंब्लीच्या 123 पीटीआय सदस्यांनी सामूहिक राजीनामा दिला.

हेही वाचा – सिंधुदुर्गातील अनधिकृत पर्सेसिन मासेमारीवर बसणार चाप, दोन स्पीड बोटी देण्याचे आश्वासन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -