घरदेश-विदेशरेस्टॉरंटमधील जेवण आता सर्व्हिस फ्री, CCPA कडून गाईडलाईन्स जारी

रेस्टॉरंटमधील जेवण आता सर्व्हिस फ्री, CCPA कडून गाईडलाईन्स जारी

Subscribe

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ग्राहकांसाठी एक दिलासाजनक घोषणा केली आहे. CCPA ने रेस्टॉरंट आणि हॉटेल्समधील सर्व्हिस चार्जबाबत नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामुळे आता ग्राहकांना बिल भरताना सर्व्हिस चार्ज द्यावा लागणार नाही. या नव्या गाईडलाईन्सनुसार, आजपासून कोणतेही रेस्टॉरंट आणि हॉटेल त्यांच्या ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी जबरदस्तीने सर्व्हिस चार्ज आकारू शकत नाही.

नवीन गाईडलाईन्सनुसार, हॉटेलमधील सर्व्हिस चार्ज भरायचा की नाही हे ग्राहकावर अवलंबून असेल, रेस्टॉरंट यासाठी ग्राहकांवर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करू शकत नाही. सर्व्हिस चार्ज हा सक्तीचा आहे किंवा नाही हे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स मालकांना ग्राहकांना स्पष्टपणे सांगावे लागणार आहे.

- Advertisement -

CCPA च्या गाईडलाईन्सनुसार हॉटेल्स आणि रेस्टॉरंटच्या बिलात ग्राहकांकडून अन्य नावाने सेवा घेता येणार नाही किंवा ती खाद्यपदार्थाच्या बिलात जोडता येणार नाही. जर एखाद्या रेस्टॉरंटने त्याच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारले तर ग्राहक राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन क्रमांक 1915 वर रेस्टॉरंटची तक्रार नोंदवू शकतो.

ग्राहक व्यवहार विभाग (DoCA) ने यापूर्वी सांगितले होते की, ते रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सकडून आकारल्या जाणार्‍या सर्व्हिस चार्जबाबत कठोर नियम लागू करण्यासाठी लवकरच एक मजबूत फ्रेमवर्क विकसित करेल, कारण त्याचा नियमितपणे ग्राहकांवर नकारात्मक परिणाम होतो.

- Advertisement -

मिंटच्या अहवालानुसार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ने स्पष्ट केले आहे की, रेस्टॉरंटद्वारे आकारले जाणारा सर्व्हिस चार्ज पूर्णपणे कायदेशीर आहे. यात ग्राहक व्यवहार विभागाने नवीन फ्रेमवर्क स्वीकारायचे की नाही हे अजून ठरवायचे आहे.


पक्षादेश झुगारल्याने परस्परांच्या विरोधात तक्रारी; शिवसेना – शिंदे गटात पक्षादेशावरून जुंपली

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -