Booster Dose: बूस्टर डोस घ्या थेट वॉक इन पद्धतीने अन् नोंदणीशिवाय

नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी त्याचे ओळखपत्र किंवा नोकरिच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. बूस्टर डोसचे शेड्यूल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ८ जानेवारीपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रीया सुरू केली जाणार आहे.

Take Booster Dose directly in walk-in mode without registration from 10 january 2022
Booster Dose: बुस्टर डोस घ्या थेट वॉक इन पद्धतीने अन् नोंदणीशिवाय

देशात कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या 60 वर्षांवरील नागरिकांना आता कोरोना विरोधी लसीचा बूस्टर डोस (Booster Dose)  देण्यात येणार आहे. बूस्टर डोस घेण्यासाठी आता नागरिकांना कोविन अँपवर रजिस्ट्रेशनची करण्याची गरज नाही. थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वॉक इन पद्धतीने बूस्टर डोस घेऊ शकता, असे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. बूस्टर डोसचे शेड्यूल ८ जानेवारी रोजी जाहीर करण्यात येणार आहे. ८ जानेवारीपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रीया सुरू केली जाणार आहे. तर १० जानेवारीपासून ऑनसाइट रजिस्ट्रेशन लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. मात्र बूस्टर डोस म्हणून कोणती लस नागरिकांना दिली जाणार याबाबत माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली नाही.

हेल्थकेअर, फ्रंटलाइन वर्कर्स आणि ह्रदयविकारासारखे गंभीर आजार असणाऱ्या नागरिकांना तसेच ६० वर्षांवरील नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्यात येणार आहे. कोरोनी विरोधी लसीचा दुसरा डोस घेऊन ९० दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. देशात नागरिकांना बूस्टर डोस देण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस घेता येणार आहे. सरकारी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस घेतल्यास निशुल्क लस घेता येईल मात्र खासगी लसीकरण केंद्रावर बूस्टर डोस घेतल्यास केंद्र सरकारने घोषित केलेल्या किंमतीला लस घ्यावी लागेल.

बूस्टर डोस लाभार्थ्यांना सरकारी लसीकरण केंद्रात ऑनसाइन पद्धतीने लसीकरण उपलब्ध असेल. नागरिकांना बूस्टर डोस घेण्यासाठी त्याचे ओळखपत्र किंवा नोकरिच्या ठिकाणाचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही

जगभरात कोरोना ओमिक्रॉन व्हेरिएंटने थैमान घातले आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे. भारतातही १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार आहे. मात्र बूस्टर डोस म्हणून कोणती लस देणार याबाबत कोणतीही माहिती नाही. कॉकटेल बूस्टर डोस देण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली मात्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)च्या एपिडेमियोलॉजी आणि कम्युनिकेबल डिसीजचे माजी अध्यक्ष डॉ. रमन गंगाखेडकर यांनी भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नसल्याचे म्हटले आहे. Booster Dose India: भारतात कॉकटेल बूस्टर डोस शक्य नाही; कोव्हॅक्सिनचा पुरवठा कमी – ICMR प्रमुख


हेही वाचा –  Booster Dose Guidelines : बूस्टर डोस घ्यायचाय! अशी करा नोंदणी, BMC ची नियमावली जारी