घरCORONA UPDATEomicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही - ICMR

omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही – ICMR

Subscribe

ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्याची पद्धत आधीच्या व्हेरिएंटसारखीच असल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे महत्त्वाचे

कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने ( omicron Variant)  संपूर्ण जगाची झोप उडवली आहे. जगभरात या व्हायरसने पुन्हा एकदा भितीचे वातावरण निर्माण केले आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे अनेक देशांनी निर्बंध लागू केले आहेत. भारतातही दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष नियम लागू करण्यात आले आहेत. देशाच्या पंतप्रधानांनी देखील या व्हेरिएंटविषयी सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. मात्र भारतीय वैद्यकीय संशोधक संस्था म्हणजेच आयसीएमआरने (ICMR) या ओमिक्रॉन व्हेरिएंटविषयी महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीएमआर नेहमीच अभ्यास आणि विचार करुन एखाद्या व्हेरिएंटवर भाष्य करत असते त्यामुळे आयसीएमआरचे केलेले वक्तव्य सर्वात महत्त्वाचे आहे. आयसीएमआरने जगात आलेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. आसीएमआरने केलेल्या या वक्तव्यानंतर सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.

आयसीएमआरचे डॉक्टर समीरन पांडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘आमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटला सध्या घाबरण्याची काहीही गरज नाही. नागरिकांनी लवकरात लवकर आपले लसीकरण करुन घ्या. ओमिक्रॉनचे म्युटेशन झाल्यास काळजी करण्याचे कारण होईल मात्र सध्या या व्हेरिएंटविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही त्यामुळे याबाबत वाट पहावी लागणार आहे’.

- Advertisement -

डॉक्टर समीरन यांनी पुढे म्हटले आहे की, ‘कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे म्युटेशनचा वेगाने फैलाव होईल असे वाटत नाही. परंतु नागरिकांनी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही फक्त देशातील लसीकरणाचा वेग वाढवा. नागरिकांनी लसीची दुसरी मात्र घ्या. दोन्ही लसी घेतल्या तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे उत्तम असेल. ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण होण्याची पद्धत आधीच्या व्हेरिएंटसारखीच असल्याने नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे महत्त्वाचे आहे’.

 

- Advertisement -

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली. या बैठकीत त्यांनी देशातील सद्य परिस्थितीचा आढावा घेतला. नव्या व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली आणि बाहेरील देशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश सर्व देशांना दिले आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंटपासून अधिक सावध राहण्याचे आणि कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन पंतप्रधनांनी केले आहे.


हेही वाचा – Omicron Covid variant: दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण, देशात नव्या व्हेरियंटचा धोका वाढला

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -