Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Coronavirus : कोरोनाबाधितांना आता वॅक्सिनची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा

Coronavirus : कोरोनाबाधितांना आता वॅक्सिनची गरज नाही, आरोग्य तज्ज्ञांचा दावा

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहिमे सुरु असतानाच लसीसकरणासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. यात कोरोनाविरोधी लस कुणाला द्यावी अथवा देऊ नये याबाबतही आरोग्य तज्ज्ञांमध्ये एकमत दिसत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यानंतर लस घ्यावी की नाही यात गोंधळून जातायंत. कोरोनाबाधित रुग्णांच्या शरीरात पुढील सहा महिन्यांपर्यंत अँटीबॉडी राहतात असे काहींचे मत आहे. भारतातही कोरोनाच्या नव्या मार्गदर्शक सुचनांनुसार, कोरोना संसर्गातून बरे झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस घ्या असा सल्ला देण्यात आला आहे. यातच एका नव्या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोनाचा संसर्गा झालेल्या व्यक्तीना लस देण्याची गरज नाही.

सध्या ‘या’ लोकांना लसीकरणाची अधिक गरज

सार्वजनिक आरोग्य तज्ञांच्या एका गटाचे असे मत आहे की, देशात मोठ्या संख्येने गोंधळलेल्या वातावरणात आणि अपूर्ण लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरियंट तयार होऊ शकतात. तसेच सध्या कोरोना संसर्गातून बरे झालेल्यांना लस घेण्याची गजर नाही असेही त्यांनी सुचविले. या आरोग्य तज्ज्ञांच्या गटात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे ( एम्स) डॉक्टरांससह कोरोनासंबंधीत टास्क फोर्समधील सहभागी डॉक्टरांचा समावेश आहे. या गटाने असाही सल्ला दिला की, सध्या सरसकट सर्वांना मोठ्या प्रमाणात लस देण्यापेक्षा फक्त असुरक्षित आणि जोखिम असलेल्या वर्गातील नारिकांना लस दिली पाहिजे.

लसीकरणाची रणनीती कशी तयार करावी याबद्दल तज्ज्ञांचे मत

- Advertisement -

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ एपिॉडमोलॉजिस्ट्स आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनच्या तज्ज्ञांनी तयार केलेला हा संयुक्त अहवालात असे म्हटले आहे की, देशातील कोरोनाची सद्यपरिस्थिती सर्व देशांतील लोकांना लस देण्यापेक्षा कोरोनासंबंधीत आकडेवारी लक्षात घेऊन लसीकरणासाठी धोरण तयार केले पाहिजे. यासंदर्भातील अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनाविरोधी लसीचे २४.५८ कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. गुरुवारी, १८ ते ४४ वयोगटातील १८६४२३४ आणि ७७१३६ नागरिकांना कोरोनाविरोधी लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला.


Monsoon 2021: १२१ वर्षानंतर मे महिन्यात दुसऱ्यांदा बरसला सर्वाधिक पाऊस- IMD


- Advertisement -

 

- Advertisement -