घरCORONA UPDATEOmicron : भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

Omicron : भारतात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

Subscribe

जगभरात दहशत माजवणाऱ्या ओमिक्रॉन विषाणूने भारताची चिंता वाढवली आहे. ओमिक्रॉनमुळे देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी संसर्ग थांबवण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज झाली आहे. अशातच केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ओमिक्रॉन विषाणूबाबत एक दिलासाजनक माहिती दिली आहे. देशात अद्याप ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सोमवारपासून केंद्रीय संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले. या अधिवेशनादरम्यान राज्यसभेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया बोलत होते. यावेळी त्यांनी भारतातील ओमिक्रान विषाणूबद्दलची सद्य स्थितीची माहिती दिली आहे.

- Advertisement -

आत्तापर्यंत जगभरातील १६ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. यात दक्षिण आफ्रिका, बॉट्सवाना, ब्रिटन, नेदरलंड, जर्मनी, हॉंगकॉंग, इटली, बेलजियम, इस्रायल, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, झेक रिपब्लिक, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि स्पेन देशांचा समावेश आहे.

- Advertisement -

दरम्यान ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग देशभरात वाढू नये यासाठी विमानतळावर दाखल होणाऱ्या सर्व प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. तर दक्षिण आफ्रिका आणि ओमिक्रॉन विषाणू आढलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवशांच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर चाचण्या केल्या जात आहेत. तर दक्षिण आफ्रिकेतील विमान प्रवासावर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत.

यात युरोपातील अनेक देशांमध्ये ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणे समोर आली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड, बोत्सावाना, ब्रिटन, ऑस्टेलिया, डेनमार्क, इस्त्राइल, बेल्जियम, चेक गणराज्य, इटली, जर्मनी आणि हाँगकाँग देशांचा यात समावेश आहे. यात दक्षिण आफ्रिकेतून ओमिक्रॉन विषाणूचे जवळपास ९९ प्रकरणं समोर आली आहेत. तर हाँगकाँगमधून २५, नेदरलँड १३, बोत्सवाना ६ आणि ब्रिटनमधून ३ प्रकरणं समोर आली आहे. यात ऑस्ट्रेलिया, डेनमार्क आणि बेल्जियममध्ये प्रत्येक २ आणि इस्त्राइल, चेक गणराज्य, इटली आणि जर्मनीमधून प्रत्येकी १ -१ प्रकरणं समोर आली आहेत. मात्र भारतात ओमिक्रॉन विषाणूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -