घरदेश-विदेशमोदींना कोणीही वाचवू शकत नाही - राहुल गांधी

मोदींना कोणीही वाचवू शकत नाही – राहुल गांधी

Subscribe

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणी वाचवू शकत नसल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केला आहे.

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता कोणीही वाचवू शकत नाही. राफेल घोटाळ्यात मोदींनी अनिल अंबानीना व्यक्तीगत फायदा करुन दिल्याचा पुनरुच्चार काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केला आहे. तसेच सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना देखील राफेल प्रकरणाची चौकशी करायची होती आणि म्हणूनच त्यांना मध्यरात्री तात्काळ पदावरुन हटवले गेले. त्याचप्रमाणे लोकसभेत मोदींनी चर्चेपासून पळ काढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी मोदींवर केला

मोदींनी डासू एव्हिएशनला दिले २० हजार कोटी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डासू एव्हिएशनला फ्रान्सकडून राफेल फायटर विमान मिळण्याआधीच २० हजार कोटी रुपये दिले होते. मात्र भारतीय एरोनॉटिक्स लिमिटेडची देणी द्यायला ते नकार देतात. असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी मोदींवर केला. मात्र एचएएलला १५ हजार ७०० कोटी रुपये द्यायला नकार देतात. त्यामुळे एचएएलला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एक हजार कोटींचे कर्ज घ्यावे लागते असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

- Advertisement -

निर्मला सीतारमनवर टीका

राहुल गांधी यांनी राफेल मुद्यावरुन निर्मला सीतारमनवर देखील टीका केली आहे. निर्मला सीतारमन या राफेल करारावरुन संसदेत खोट्या बोलत असल्याचा संरक्षण मंत्री नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रवक्त्या आहेत, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राफेल करारात निर्मला सीतारामन यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता की नाही, याचे सरकारने आधी उत्तर द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे मोदींनी राफेलबाबत संसदेत माझ्याशी १५ मिनिटे चर्चा करावी असे आवाहनी करण्यात आले आहे.


वाचा – राफेल करारावर पंतप्रधानांनी बोलावं – राहुल गांधी

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -