CRPF जवानांना सोशल मीडिया वापरासाठी ‘हे’ नवे नियम लागू

No Political Remarks Paramilitary Force CRPFs New Social Media Rules

केंद्रीय राखीव पोलीस दलाने आपल्या जवानांसाठी सोशल मीडिया वापरासाठी काही नवे नियम लागू केले आहेत. या नव्या नियमांनुसार, सीआरपीएफ जवानाला सोशल मीडियावर वादग्रस्त किंवा राजकीय बाबींवर भाष्य न करण्याच्या सुचना दिल्या आहेत.

फोर्समधील जवान सीसीएस आचार नियम 1964 चे उल्लंघन करत आपल्या वैयक्तिक तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मदत घेत आहेत. हीच बाब लश्रात घेत गेल्या आठवड्यात दिल्लीतील दलाच्या मुख्यालयाने दोन पानी सुचना जारी केल्या होत्या. त्यामुळे जवानांना या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन विभागाने केले आहे.

या आहेत नवे नियम

१) जवानांना इंटरनेटवरील सोशल नेटवर्किंगवर सरकार किंवा तुमच्या स्वत:च्या प्रतिष्ठेला धक्का पोहचेल असं काही शेअर करु नका.

२) सरकारच्या धोरणांवर प्रतिकूल टिप्पणी करु नका, तसेच सार्वजनिक मंचावरूनही राजकीय, धार्मिक विधाने करु नका.

३) वादग्रस्त, संवेदनशील किंवा राजकीय विषयांवर भाष्य करु नका.

४) जवानांनी राग, द्वेष किंवा दारूच्या नशेत काहीही लिहू नये, पोस्ट करु नये.

५) अज्ञात व्यक्तींबरोबर मैत्री करताना त्यांना फॉलो करताना काळजी घ्या.

या नव्या नियमांमध्ये जवानांना संवेदनशील समस्या, लैंगिक समस्या आणि वादग्रस्त मुद्द्यावर ऑनलाईन टिप्पणी करताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यासोबत अधिकृत बाबी आणि तक्रारी करण्यासाठी सोशल मीडिया योग्य व्यासपीठ नसल्याचेही सांगितले आहे.

त्यामुळे दलातील जवानांना काही अडचणी किंवा तक्रारी असल्यास त्यांनी संस्थात्मक व्यासपीठावरून त्या मांडाव्यात असही यात नमूद आहे. दलातील जवानांना सायबर बुलिंग आणि छळाविरोधात जागरुक करण्यासाठी तसेच संवेदनशील करण्यासाठी या नव्या मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहे, या सुचनांचे पालन करणं दलातील जवानांना बंधनकारक आहे. काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारची मार्गदर्शक तत्त्वे दलाने जारी केली होती.


बुलढाण्यातील समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 20 जण जखमी