Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश सोशल मीडियावर नियंत्रणाचा विचार नाही- राज्यवर्धन राठोड

सोशल मीडियावर नियंत्रणाचा विचार नाही- राज्यवर्धन राठोड

Subscribe

सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा विचार नसल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सोमवारी राज्यसभेत स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाला राठोड यांनी लेखी उत्तर दिले.

केंद्र सरकार सोशल मीडियावर नियंत्रणाचा कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्टीकरण माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत सोमवारी दिले आहे. मात्र सोशल मीडियावरून पाठवल्या जाणाऱ्या माहितीसंदर्भात हब उभारण्याचा विचार असल्याचे राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले आहे. केंद्र सरकार सोशल मीडियावर नियंत्रणाचा कोणता विचार करत आहे का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता. त्यावर लेखी उत्तराद्वारे राज्यवर्धन राठोड यांनी राज्यसभेत सरकार सोशल मीडियावर नियंत्रणाचा कोणताही विचार करत नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, व्हॉटसअॅप, युट्युब, फेसबुक आणि इन्टाग्राम वरून पाठवल्या जाणाऱ्या माहितीसंदर्भात हब उभारले जाणार असल्याचे राज्यवर्धन राठोड यांनी म्हटले आहे.

सोशल मीडियावर सरकारचे नियंत्रण

दरम्यान, सोशल मीडियावर सरकार नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे. सोशल मीडियावरून सरकारविरोधात प्रचार केला जात असल्याने सरकार बिथरले असून आता सोशल मीडियावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला गेला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने देखील सरकार सोशल मीडियावर सरकार नियंत्रणाचा प्रयत्न करत आहे का? असा सवाल विचारला होता. त्यावर सोमवारी राज्यवर्धन राठोड यांनी लेखी उत्तराद्वारे सरकार सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारे नियंत्रण मिळवणार नसल्याचे स्पष्ट केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -