घरCORONA UPDATEलॉकडाऊन किस्सा... दोन हार आणि लाडू बस्स...झालं की हो लग्न!

लॉकडाऊन किस्सा… दोन हार आणि लाडू बस्स…झालं की हो लग्न!

Subscribe

या जोडप्याने सामाजिक आणि धार्मिक रुढी-परंपरा बाजूला ठेवत एका वेगळ्यात पद्धतीने एकमेकांशी लग्नाची गाठ बांधली.

देशातील लॉकडाऊनचा लग्नासारख्या महत्त्वाच्या गोष्टवर परिणाम झाला आहे. कोणी आहे त्या परिस्थीतीत लग्न उरकून घेत आहे. ज्यांना साग्रसंगीत लग्न करायचं आहे त्यांनी मात्र आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेल्या या लग्नांची चांगलीच चर्चा रंगली.    काहींनी कमी लोकांमध्ये लग्न केलं. काहींनी घरातचं लग्न केलं, काहीच्या लग्नात तर चक्क पोलिसांनीच कन्यादान केलं. या विवाहसोहळा पार पडला आहे, पंजाबमध्ये. पण हे लग्न अत्यंत साध्यापध्दतीने पार पडलं. ना लग्नात सप्तपदी झाली ना, ना कन्यादान.

असा पार पडला हा विवाह सोहळा

या जोडप्याने सामाजिक आणि धार्मिक रुढी-परंपरा बाजूला ठेवत एका वेगळ्यात पद्धतीने एकमेकांशी लग्नाची गाठ बांधली. विशेष म्हणजे या लग्नासाठी केवळ 320 रुपयांचा खर्च झाला. या जोडप्यातील वराचे नाव रणबीर सिंह रंधावा तर वधूचं नाव हरदीप कौर आहे. रणबीर पंजाब विद्यार्थी युनियनचा प्रधान आहे. तर त्यांची पत्नी हरदीप कौर कोटाला युनियनची उपप्रधान आहे. हरदीप कौर यांचं अख्खं कुटुंब कॅनडात स्थायिक आहेत. मात्र कुटुंबाच्या मनाविरोधात तिने कॅनडाचं नागरिकत्वावरुन आपलं नाव हटवलं आणि पंजाबमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

ही अनोखी प्रेम कहाणी

रणबीर आणि हरदीप गेले काही दिवस एकत्र काम करतात. तेव्हा रणबीरला वाटले हरदीपच त्याच्यासाठी चांगली जोडीदार असू शकते. आम्ही दोघं एकाच युनियनमध्ये काम करीत होतो आणि आमची विचारधाराही एकच होती,  त्यामुळे अनेकांनी मला हरदीपशी लग्न करण्याचा आग्रह केला. आम्ही साध्याच पद्धतीने लग्न करणार असल्याचं ठरवलं होतं. त्यानुसार आम्ही घरातचं लग्न केलं. दोन हार मागवले आणि काही लाडू. बस्स…त्यामुळे या लग्नासाठी केवळ ३२० रुपये खर्च आला.


हे ही वाचा – Photos – मराठी कलाकरांचा ‘Mummy’s Special’ दिवस!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -