घरCORONA UPDATECoronavirus: वास, चव न येणे कोरोनाची सर्वात पहिली लक्षणं

Coronavirus: वास, चव न येणे कोरोनाची सर्वात पहिली लक्षणं

Subscribe

असा दावा आता अमेरिकेतील वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग झालेल्यांना ज्ञात असलेली लक्षणे आढळ्यास त्वरित उपचार केले जात आहेत. मात्र या लक्षणांमध्ये वाढही होताना दिसत आहे. विशेष म्हणजे अशी काही लक्षणे समोर आली आहेत जी कोरोनाची सर्वात आधीची लक्षणे आहेत. असा दावा आता अमेरिकेतील वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांनी केला आहे. एखाद्याचे घाणेंद्रिय काम करणे बंद झाले असेल. त्याला कोणताही वास येत नसेल आणि जिभेला चव जाणवत नसेल तर हि कोरोनाची सर्वात प्राथमिक लक्षणे आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. जगातील बहुतांश कोरोनाबाधित देशामंधील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये हि लक्षणे आढळून आली असल्याचे अमेरिकन अकॅडेमी ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजीचे प्रमुख जेम्स सी डेंनी यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – Coronavirus: अमेरिकेत २ हजार जणांचा मृत्यू; ट्रंप बोलतात क्वारंटाईनची गरज नाही

- Advertisement -

स्वर आणि कान यासंबंधी आजारांवर ते निष्णात आहेत. कुणालाही वास न येणे, चव न जाणवणे, ताप येणे हि सामान्य ऍलर्जी किंव्हा सायनसची लक्षणे वाटू शकतात. मात्र ती कोरोनाचीही असू शकतात. अशी लक्षणे आढळून येणाऱ्यांनी त्यांची कोरोनाची चाचणी करून घेणे तसेच सर्वात आधी स्वतःला आयसोलेशन करून घेणे गरजेचे आहे, असे जेम्स डेंनी म्हणाले. काही जणांमध्ये हि लक्षणे सुरुवातीला जाणवू शकतात किंव्हा काहींमध्ये नंतर जाणवू शकतात. कोरोनाग्रस्त रुग्णांचा अभ्यास करून जमा केलेल्या माहितीवरून आता हि लक्षणे कोरोनाची असल्याचे निश्चित झाले आहे, असेही ते म्हणाले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -