घरदेश-विदेशNobel Prize 2023: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ज्ञांना मिळाला सन्मान

Nobel Prize 2023: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ज्ञांना मिळाला सन्मान

Subscribe

इलेक्ट्रॉनवरील अभ्यासासाठी हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात आला, ज्यामध्ये पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद पल्स निर्माण केल्या गेल्या.

नवी दिल्ली : सोमवार (2 ऑक्टोबरपासून) जगातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार म्हणून ओळख असलेल्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. सोमवारी वैद्यकीय विभागातील दोन शास्त्रज्ज्ञांना या पुरस्कार जाहीर झाला असून, आज मंगळवारी भौतिकशास्त्रातील तीन शास्त्रज्ज्ञांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये पियरे एगोस्टिनी, फेरेंक क्रॉस्ज आणि ऐनी एल हुइलियर यांचा समावेश आहे. (Nobel Prize 2023 Nobel Prize in Physics announced Three scientists were honored)

इलेक्ट्रॉनवरील अभ्यासासाठी हा सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार प्रायोगिक पद्धतींसाठी देण्यात आला, ज्यामध्ये पदार्थातील इलेक्ट्रॉनच्या गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी प्रकाशाच्या अ‍ॅटोसेकंद पल्स निर्माण केल्या गेल्या. भौतिकशास्त्राच्या या क्षेत्रात नोबेल मिळवणाऱ्या अॅन हुलियर या पाचव्या महिला ठरल्या आहेत हे विशेष.
मागील वर्षी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार संयुक्त पद्थतीने देण्यात आला होता. त्यामध्ये अलेन अस्पेक्ट, जॉन एफ क्लाउसर आणि एंटन जिलिंगर यांचा समावेश होता. अलेन अस्पेक्ट फ्रान्सचे, जॉन एफ क्लाऊसर अमेरिकेकेचे आणि एंटन जिलिंगर ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ज्ञ आहे. या शास्त्रज्ज्ञांच्या प्रयोगामुळे क्वांटन सूचनेच्या आधारवरील नव्या टेक्नॉलॉजीचा रस्ता मोकळा झाला होता.

- Advertisement -

हेही वाचा : Nobel Prize 2023: नोबेल पुरस्कारांची आजपासून घोषणा; वैद्यकीय क्षेत्रातील दोघांची नावे जाहीर

- Advertisement -

सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ज्ञांची झाली होती घोषणा

विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणाऱ्या कर्तबगारांना जगातील सर्वश्रेष्ठ अशा नोबेल पुरस्काराने सन्मांनित करण्यात येते. 2023 या वर्षाच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सोमवार (2 ऑक्टोबर) पासून सुरू झाली. या अंतर्गत सोमवारी फिजिओलॉजी किंवा मेडिसिन या क्षेत्रातील विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. यावर्षी कॅटालिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी संबंधित शोधांसाठी त्यांना हा सन्मान देण्यात आला. या शोधामुळे कोरोनाव्हायरस म्हणजेच COVID-19 विरुद्ध प्रभावी mRNA लस विकसित करण्यात मदत झाली. नोबेल समितीचे सचिव थॉमस पर्लमन यांनी कोरोलिंस्का इन्स्टिट्यूटमध्ये विजेत्याची घोषणा केली.

हेही वाचा : राहुल गांधींच्या नेतृत्वातील इंडिया आघाडी आपल्याला लढाच देऊ शकत नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

सोमवारपासून पुरस्कारांची घोषणा

नोबेल पारितोषिकांची घोषणा वैद्यक क्षेत्रातील नोबेल पुरस्काराने सुरू झाली आहे. यात मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्य क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल. याशिवाय नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा शुक्रवारी होणार असून, अर्थशास्त्र क्षेत्रातील हा पुरस्कार विजेत्याची घोषणा 9 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

एवढी मिळाली पुरस्काराची रक्कम

देण्यात आलेल्या पुरस्काराची रक्कम एक दशलक्ष डॉलर्स एवढी आहे. हा निधी पुरस्काराचे संस्थापक आणि स्वीडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांनी सोडून दिलेल्या मृत्यूपत्रामधून मिळते. अल्फ्रेड नोबेल यांचे निधन 1896 मध्ये झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -