Eco friendly bappa Competition
घर क्राइम ऑनलाइन सट्टेबाजांचा पर्दाफाश; नोएडा पोलिसांकडून १६ जणांना अटक

ऑनलाइन सट्टेबाजांचा पर्दाफाश; नोएडा पोलिसांकडून १६ जणांना अटक

Subscribe

एका अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बेटींग खेळाणाऱ्यांवर अटकेची कारवाई केल्याची घटना दिल्लीत घडली. महादेव बुक अॅपवरून ऑनलाइन बेटींग खेळणाऱ्या १६ जणांना दिल्लीतील सेक्टर-३९ कोतवाली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे.

एका अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बेटींग खेळाणाऱ्यांवर अटकेची कारवाई केल्याची घटना नोएडात घडली. महादेव बुक अॅपवरून ऑनलाइन बेटींग खेळणाऱ्या १६ जणांना दिल्लीतील सेक्टर-३९ कोतवाली परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. अरुण लखेरा, राहुल, अभिषेक, आकाश साहू, हिमांशू, अनुराग वर्मा, विवेक, दीपक, विशाल शर्मा, अभि रावत, दिव्या प्रकाश, हर्षित चौरसिया, अक्षय तिवारी, नीरज गुप्ता, आकाश जोशी, दीपक अशी आरोपींची नावे आहेत. (noida police arrested 16 bookies app operating from dubai)

नोएडातील सेक्टर-39 कोतवाली परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये या १६ जणांचा ऑनलाइन बेटींगचा व्यवसाय सुरू होता. या बेटींगचे कनेक्शन थेट दुबईशी असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी अटकेची कारवाई केली असता, आरोपींकडून चार अब्जांचा बेटींगचा व्यवहार पोलिसांना आढळून आला आहे. तसेच, 22 खात्यांमधील दीड कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

- Advertisement -

६० हून अधिक बँक खात्यांची माहितीही प्राप्त झाली असून, 350 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याचे समजते. पोलिसांनी आरोपीकडून 100 मोबाईल फोन, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅझेट, एटीएम कार्ड, सिम जप्त केले आणि त्याच्या खात्यातील दीड कोटी रुपये जप्त केले आहेत. तसेच, आरोपी दुबईहून प्रशिक्षण घेऊन आले होते. आरोपी आमिष दाखवून फसवणूक करायचे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध आयपीसी कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७१, १२०बी, ६६ आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

या किरकोळ प्रकारानंतर बॅकफूटवर आलेल्या पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेच्या माहितीच्या आधारे या टोळीचा पर्दाफाश केला आहे. छत्तीसगडच्या दुर्ग पोलिसांनी चार दिवसांपूर्वी ग्रेटर नोएडा येथील एलेस्टोनिया अपार्टमेंटच्या 9व्या मजल्यावर छापा टाकून महादेव अॅपवर सट्टा लावणाऱ्या नऊ आरोपींना अटक केली.

- Advertisement -

भाटापारा येथील लोकेश कलवानी, भिलाई येथील अभिषेक सिंग, जामूल येथील विशाल कुशवाह, छावणी येथील अंकुश वर्मा, सुपेला येथील आकाश साहू, वैशाली नगर येथील अंकित कनोजिया, बिलासपूर येथील वैभव सिंग, भिलाई येथील शुभम राव आणि डी. खुर्शीपार अशी आरोपींची नावे आहेत. या आरोपींपाकी अंकित हा कर्नाटकातील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होता.

विशेष म्हणजे गेल्या 9 महिन्यांपासून छत्तीसगडचे पोलीस महादेव ऑनलाइन बेटिंगवर सातत्याने कारवाई करत आहेत. आतापर्यंत 125 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. गेल्या 9 महिन्यांत समोर आलेल्या सर्व नोंदींमध्ये कोट्यवधी रुपयांचे व्यवहार समोर येत आहेत, ज्यात मनी लाँड्रिंगचा मोठा भाग आहे. आरोपींकडे तीन लॅपटॉप, 15 अँड्रॉइड मोबाईल, 50 हून अधिक बँकांचे पासबुक, चेकबुक एटीएमसह 15 हून अधिक मोबाईलची सिम होती.

दरम्यान, गेल्या अनेक महिन्यांत 10 कोटींहून अधिकचे बँक व्यवहारही आढळून आले. यानंतर नोएडा पोलिसांनीही कडक कारवाई केली. ज्या बँकेत पैशांचा व्यवहार झाला ते खातेही गोठवण्यात आले आहे. महादेव ऑनलाइन सट्टा अॅपबाबत पोलिस संवेदनशील दिसत आहेत.

नोएडा पोलिसांनंतर ईडी, एनआयए देखील नोएडा पोलिसांशी संपर्क साधू शकतात. या प्रकरणी सुरजपूर कोतवाली पोलिसांनी सोसायटीच्या मेंटेनन्स मॅनेजरच्या तक्रारीवरून दुर्ग पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर नोएडा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांमध्ये पुन्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे.


हेही वाचा – भाजपमध्ये येण्यासाठी तयार असलेल्यांच स्वागतच…; थोरातांच्या राजीनाम्यानंतर बावनकुळेंचं सूचक विधान

- Advertisment -