चीनी खेळण्यांना टक्कर देण्यासाठी ‘या’ शहरात उभी राहतेय खेळण्यांची फॅक्ट्री, ६०० लोकांना मिळणार रोजगार

noida to become first indian toy manufacturing hub more than 6000 people will get employment
चीनी खेळण्यांना टक्कर देण्यासाठी 'या' शहरात उभी राहतेय खेळण्यांची फॅक्ट्री, ६०० लोकांना मिळणार रोजगार

सध्या भारतीय बाजारपेठांमध्ये चीनी खेळण्यांचा बोलबाला आहे. अत्यंत कमी किंमतीत आकर्षक अशी ही चीनी खेळणी लहान मुलांनाही अधिक आवडतात. एखाद्या घरात लहानग्याचे बारसे असो किंवा वाढदिवस असो नातेवाईकांकडून भेट म्हणून ही खेळणी दिला जातात. मात्र ही ‘मेड इन चायना’ खेळणी अनेकदा लहानग्यांचा जीवावार बेततात. तरीही लहानग्यांकडून खेळण्यांचा हट्ट केला जातो. त्यामुळे खेळण्यांचे बाजारपेठही चीनच्या विळख्यात सापडले आहे. या बाजारपेठेत जवळपास ७० टक्के खेळणी चिनी बनावटीची आहेत. त्यांना भारतीय कंपन्या अजूनही समर्थ पर्याय उभा करू शकलेल्या नाहीत. परंतु आता चीन खेळण्यांना टक्कर देण्यासाठी उत्तर प्रदेश राज्यात भारतातील पहिली खेळण्यांची फॅक्ट्री निर्माण केली जात आहे.

योगी आदित्यनाथ सरकारने नोएडाच्या सेक्टर ३३ मध्ये टॉय पार्कची निर्मिती केली आहे. या पार्कमध्ये १३४ उद्योगपतींनी विविध खेळण्यांची फॅक्ट्री सुरु करण्यासाठी जमीन खरेदी केल्या आहेत. भारताच्या या स्वदेशी खेळण्यांची फॅक्ट्री चीनी खेळण्यांच्या फॅक्ट्रीला टक्कर देईल. या टॉय पार्कमध्ये खेळण्याच्या फॅक्ट्री सुरु करण्यासाठी १३४ उद्योगपतींकडून ४१०.१३ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या खेळण्यांच्या फॅक्ट्रींमुळे देशातील ६१५७ लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. सध्या देशात लहान मुलांची खेळणी तयार करणाऱ्या ४ हजारहून अधिक युनिट्स आहेत.

गेल्या वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून खेळण्यांची जगभरातील बाजारपेठेत भारताचा वाटा वाढण्यासंदर्भात चर्चा केली होती. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खेळण्याची मोठी बाजारपेठ सुरु करण्यासाठी अनेक निर्णय घेतले. यात उत्तर प्रदेशात खेळण्यांचे क्लस्टर (टॉय पार्क) यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक प्राधिकरण क्षेत्रात निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरचं जमीन खरेदी करणाऱ्या कंपन्या या टॉय पार्कमध्ये फॅक्ट्री बनवण्याचे काम सुरु करणार आहेत.

फन राईड टॉयज एलएलपी, सुपर शूज, फन झू टॉयज इंडिया, आयुष टॉय मार्केटिंग, सनलॉर्ड अॅपरल्स, भारत प्लास्टिक, जय श्री कृष्णा, गणपती क्रिएशन्स आणि आरआरएस ट्रेडर्स या टॉय पार्कमध्ये जमीन संपादित करणाऱ्या प्रमुख कंपन्या आहेत. प्लास्टिक आणि लाकडापासून बनवलेली बॅटरीवर चालणारी खेळणी टॉय पार्कमध्ये बनवली जातील. सध्या भारतात चीनी बनावटीची खेळणी देशातील लहान मुले खेळतात. टॉय पार्कमध्ये खेळण्यांची फॅक्ट्री उभारण्यासाठी पुढे आलेल्या या कंपन्या चिनी बनावटीच्या खेळण्यांना आव्हान देतील. एका अंदाजानुसार, २०२४ पर्यंत भारतातील खेळण्यांचा उद्योग १४७-२२१ अब्ज रुपयांचा असेल.