घरदेश-विदेशसंसदरत्न पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर, अमोल कोल्हेंसह महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश

संसदरत्न पुरस्कारांसाठी नामांकने जाहीर, अमोल कोल्हेंसह महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश

Subscribe

नवी दिल्ली – संसद रत्न २०२३ पुरस्कारासाठी (Sansad Ratna Award 2023) १३ खासदारांचे नामांकन जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये चार खासदार महाराष्ट्रातील असून अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांनाही नामांकन मिळाले आहे. तर, १३ पैकी ८ खासदार लोकसभेचे असून पाच खासदार राज्यसभेचे आहेत. २५ मार्चला हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.

केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल (Arjun Ram Meghwal) आणि माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.कृष्णमूर्ती (S.Krushnamurti) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या निवड समितीने १३ खासदारांचे नामांकन जाहीर केले आहे. यामध्ये ८ खासदार लोकसभेचे असून पाच खासदार राज्यसभेचे आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – ‘बेवफाई’ सिद्ध करण्यासाठी डीएनए चाचणीचा शॉर्टकट म्हणून वापर अयोग्य, सुप्रीम कोर्टाचे मत

काँग्रेसचे खासदार रंजन चौधरी, कुलदीप राय शर्मा, भाजपाचे विद्युत बरन महतो, डॉ.सुकांत मजुमदार, हिना गावित, गोपाळ शेट्टी, सुधीर गुप्ता, राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे, आदी खासदारांना लोकसभेतून नामांकन मिळाले आहे. तर, राज्यसभेतून सीपीएमचे जॉन ब्रिट्स, राजदचे मनोज झा, राष्ट्रवादीच्या फौजिया खान, सपाचे विश्वंभर निषाद, काँग्रेसच्या छाया वर्मा यांना नामांकन मिळाले आहे.

- Advertisement -

वित्त समिती (लोकसभा समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा) आणि परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती (राज्यसभा समितीचे अध्यक्ष व्ही विजयसाई रेड्डी, YSR काँग्रेस) यांना 17 व्या लोकसभेच्या सुरुवातीपासून उत्कृष्ट कामगिरीसाठी नामांकित करण्यात आले आहे.

हेही वाचा – पाश्चिमात्य देशांमुळे युद्ध भडकले..; संसदेत भाषण करताना पुतीन संतापले

नामांकन देण्याचे निकष काय?

लोकसभेचे ५४४ आणि राज्यसभेचे २५४ खासदारांपैकी एका संसदरत्नाची निवड केली जाते. त्यासाठी काही निवडक नावे नामांकन म्हणून जाहीर केली जातात. यासाठी संसदेतील खासदारांची उपस्थिती, त्यांनी मांडलेले विधेयके, चर्चेतील सहभाग, आदी विविध मुद्द्यांचा विचार करून खासदारांना नामांकन दिलं जातं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -