घरताज्या घडामोडीस्मोकिंगचा संबंधच नाही.., मग का वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका?

स्मोकिंगचा संबंधच नाही.., मग का वाढतोय फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका?

Subscribe

स्मोकिंग केल्यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा मानवाला होतो. स्मोकिंग करणं हा तंबाखू सेवन करण्याचा सर्वात सामान्य मार्ग आहे. तसेच इतर प्रकारचे तंबाखूचे सेवन देखील केले जाते. यामध्ये धूरविरहित तंबाखूचा वापर केला जातो. स्मोकिंग बंद केल्यानंतर सर्वांनाच फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या जोखमीबद्दल कायमच उत्सुकता असते. परंतु ज्या लोकांचा स्मोकिंगशी संबंधच नाही तर मग त्यांना फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका का होतोय?, नेमकं या मागील कारण काय आहे, याबाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका हा नॅशनल कॅन्सर रजिस्ट्रीमध्ये पहिल्या नंबरवर आहे. सर्वात जास्त केसेस या फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या असतात. परंतु मेदांता या रुग्णालयाने या आजाराबाबत रिसर्च केला असता ५० टक्के रुग्ण धूम्रपान न करणारे असून ७० टक्के रुग्ण हे ५० वर्षांखालील आहेत, असं या रिसर्चमध्ये आढळून आलं आहे.

- Advertisement -

३० वर्षांखालील हे रुग्ण धूम्रपान न करणारे होते. या कर्करोगामुळे महिला देखील अधिक प्रभावित होत आहेत. तरुणांमध्ये स्व्कॅमस कार्सिनोमाच्या तुलनेत एडेनोकार्सिनोमा या अधिक घातक असलेल्या कॅन्सरच्या अनेक केसेस दिसून आल्या आहेत.

​ही लक्षणं गांभीर्याने घ्या –

- Advertisement -

फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे सामान्यत: रुग्णाला खोकल्यापासून रक्त येते, हे एक चिंताजनक लक्षण आहे. फुफ्फुसाचा कर्करोगाचा सर्वात वारंवार प्रकार म्हणजे फुफ्फुसाचा एडेनोकार्सिनोमा. हे ट्यूमर फुफ्फुसाच्या बाहेरील भागात तयार होतात. अशा रुग्णांना सौम्य खोकला, अधूनमधून श्वास घेण्यास त्रास होतो. ज्याला सामान्य सर्दी म्हणून नाकारले जाऊ शकते.


हेही वाचा : राज्यपाल पदावर जबाबदार व्यक्तीची निवड करावी, वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -