Homeदेश-विदेशNorth Bhutan: चीनचं नवं कारस्थान; भूतानच्या वादग्रस्त भागात बांधली 235 घरं

North Bhutan: चीनचं नवं कारस्थान; भूतानच्या वादग्रस्त भागात बांधली 235 घरं

Subscribe

चीन आणि भूतानमध्ये सुरू असलेल्या सीमा चर्चेनंतरही चीन आपले डावपेच सोडत नाही. आता चीन भूतानला लागून असलेल्या वादग्रस्त जमिनीवर गावे बांधत आहे.

नवी दिल्ली: चीन आणि भूतानमध्ये सुरू असलेल्या सीमा चर्चेनंतरही चीन आपले डावपेच खेळणं सुरूच ठेवलं आहे.  आता चीन भूतानला लागून असलेल्या वादग्रस्त जमिनीवर गावे बांधत आहे. हाँगकाँग मीडिया हाऊस साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, चीन आणि भूतानला वेगळे करणाऱ्या डोंगराळ भागात चीनने 3 गावे बांधली आहेत. ज्याचा आकार आता पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. (North Bhutan Another intrigue of China 235 houses built in disputed areas of Bhutan)

रिपोर्टनुसार, चीनने हिमालयातील एका दुर्गम गावात आपला कब्जा जमवून, आता आणखी जागा हडप करत गावं वसवली आहेत. चीन आणि भूतान या दोन देशांत या जमिनीच्या जागेवरून बराच काळापासून वाद सुरू आहे. चीनने आधीच काही लोकांना या गावांत स्थायिक केलं आहे, तर आता आणखी 18 कुटुंबांना इथे हलवणार आहे. सर्व घरांवर चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे फ्रेम केलेले फोटो लावण्यात आले आहे.

तिबेटमधील 38 कुटुंबेही स्थलांतरित

जिनपिंग यांच्या पोर्ट्रेटच्या मागे, एक चमकदार लाल बॅनर,  चिनी आणि तिबेटी लिपीत चिनी अध्यक्षांचे स्वागत करताना दिसत आहे. तिबेट फेडरेशन ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या गावांमध्ये राहण्यासाठी गेलेली कुटुंबे हा या गावातील पहिला गट आहे. यामध्ये तिबेटमधील शिगात्से भागातील 38 कुटुंबांचादेखील समावेश आहे.

चीन झपाट्याने करतंय गावांचा विस्तार

भूतानच्या किनाऱ्यावर वसलेल्या डोंगराळ भागावर चीनने नवीन घरे बांधली आहेत. अहवालात म्हटले आहे की, तिबेट स्वायत्त प्रदेशातील स्थानिक सरकारांनी गेल्या वर्षभरात सीमावर्ती गावांचा झपाट्याने विस्तार केला आहे. 2023 पर्यंत तामालुंगचा आकार दुप्पट होईल.

अमेरिकेच्या मॅक्सार टेक्नॉलॉजीच्या सॅटेलाइट इमेजवरून चीनचा हा नवा कब्जा उघड झाला असून, याठिकाणी 147 नवीन घरे बांधल्याचे समोर आले आहे. 2022 च्या अखेरीस गावाची लोकसंख्या 235 कुटुंबांपर्यंत वाढविण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती, ज्यामध्ये 70 घरांमध्ये अतिरिक्त 200 लोक राहतात.

चीनचा भारत-भूतानसोबतचा सीमावाद

चीन आणि भूतानमध्ये कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत, परंतु अधिकारी वेळोवेळी भेटी देऊन संपर्क ठेवतात. चीनने त्याच्या इतर 12 शेजाऱ्यांसोबतचे सीमा विवाद सोडवले आहेत. भारत आणि भूतान हे दोनच देश आहेत ज्यांच्याशी अद्याप सीमा करार झालेला नाही. अलिकडच्या वर्षांत, चीनने भूतानशी संपूर्ण राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी आणि जटिल सीमा विवाद सोडवण्यासाठी वाटाघाटींना गती देण्याचे प्रयत्न वाढवले आहेत. भूतानचा दावा आहे की, चीन ज्या ठिकाणी गावांचा विस्तार करत आहे ती जागा आपल्या मालकीची आहे पण चीन त्यावर वसाहती उभारत आहे.

(हेही वाचा: Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशन, निर्णयाकडे राज्याचे लक्ष)