घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकिम जोंग उन २० दिवसांनंतर आले जगासमोर, अफवांना मिळाला पूर्णविराम

किम जोंग उन २० दिवसांनंतर आले जगासमोर, अफवांना मिळाला पूर्णविराम

Subscribe

अखेर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या प्रकृतीबद्दलच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. किम जोंग उन २० दिवसांनंतर परतले आहे.

काही दिवसांपासून उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग उन यांच्या विषयीच्या अफवांना उधाण आले होते. जगभरात त्यांच्याविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. कुणी म्हणत होत की त्यांना हृदयविकार झालाय तर कुणी म्हणत होत त्यांना मेंदूचा आजार झाला. तसेच त्याच्या ह्रदयात चुकीचा स्टेंट किंवा चुकीच्या जागी स्टेंट टाकला गेलाय तर त्यांना कुठलातरी असाध्य आजार झालाय. अशा अनेक अफवांना उधाण आले होते. मात्र या अफवांना अखेरचा पूर्णविराम मिळाला आहेत.

उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंग हे २० दिवसांनंतर परत आले आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेने ते २० दिवसांनंतर एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची माहिती दिली आहे. उत्तर कोरियाची न्युज एजन्सी केसीएनने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन एका खतं तयार करणाऱ्या कारखान्याच्या उद्घाटनाला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात उपस्थित झाल्यामुळे त्यांचे लोकांनी जोरदार स्वागत केले. त्यांनी कारखान्यांची पाहणी केली आणि उत्पादन प्रक्रियाबद्दल माहिती घेतली.

- Advertisement -

किम जोंग उन ११ एप्रिलपासून जगासमोर आले नव्हते. उत्तर कोरियामध्ये हुकूमशाही राजवट असल्यामुळे प्रमुखाच्या अनेक गोष्टी गोपनीय ठेवल्या जातात. अनेक दिवसांपासून किम जोंग उन कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे दिसत होते. त्यामुळे जागतिक माध्यमांनी अनेक तर्क-वितर्क लावून त्यांची प्रकृतीबद्दलचे वृत्त दिले होते. यावेळेस मात्र कोरियन माध्यमांनी कोणतेही वृत्त दिले नाही. त्यामुळेच त्यांच्या प्रकृतीबाबतची माहिती खात्रीलायक पुढे नव्हती.


हेही वाचा – Corona Update Live: पुण्यात ६८ वर्षीय कोरोनाबाधिताचा बळी, मृतांचा आकडा १००पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -