घरताज्या घडामोडीNorth Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला !

North Korea Lockdown : दक्षिण कोरियात शॅम्पू मिळतोय २०० डॉलर्सला !

Subscribe

सुपर मार्केट ओसाड

दक्षिण कोरियाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. पण या उपाययोजनांचा आर्थिक फटका आता अनेक वस्तुंच्या किंमती वाढण्याच्या निमित्ताने दिसून येत आहे. दक्षिण कोरियामध्ये एक शॅम्पू खरेदीसाठी आता नागरिकांना २०० डॉलर्स मोजण्याची वेळ आली आहे. देशाअंतर्गत सर्व प्रकारची परदेशी वस्तूंची आयात ठप्प झाल्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसू लागला आहे. त्याचाच भाग म्हणजे आयात करण्यात येणाऱ्या केळ्यांसाठीही नागरिकांना ४५ डॉलर्स मोजावे लागत आहेत. तर दुसरीकडे देशातील सुपरमार्केट माल नसल्याने ओसाड पडल्याचे चित्र आहे. कोरियातील किम जोंग उन यासारख्या नेत्यानेही ही अवस्था जवळून पाहतानाच आता रेल्वे आणि जहाज वाहतूकीच्या माध्यमातून देशात वस्तूंचा पुरवठा करण्याची तयारी सुरू केली आहे.

केळ्यासाठी मोजावे लागताहेत ४५ डॉलर्स

दक्षिण कोरियाला सध्या मोठ्या प्रमाणात अन्नाचा तुटवडा भासवतोय. दक्षिण कोरियाला येत्या काळात जवळपास १.३५ दशलक्ष टन इतक्या मोठ्या प्रमाणात अन्नधान्याचा तुटवडा जाणवेल असा अंदाज नुकत्याच एका अहवालातून मांडण्यात आला आहे. त्यातच देशाअंतर्गत मका लागवडीतही दक्षिण कोरियाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण कोरियामध्ये अनेक वस्तुंच्या किंमती या गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पटींनी वाढल्याचे समोर आले आहे. यासाठी कारणे ही मुख्यत्वे म्हणजे देशाच्या सीमा बंद करणे आणि परदेशी व्यापाऱ्याला बंदी आणणे यासारखी आहेत. देशात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा फटका हा दक्षिण कोरियातील महागाईसाठी कारणीभूत ठरत आहे. दक्षिण कोरियात आयात होणाऱ्या केळ्यांसाठीही नागरिकांना ४५ डॉलर्स मोजण्याची वेळ आली आहे. तर तांदुळ आणि मक्याचे दरही काही आठवड्यातच वाढले आहेत.

- Advertisement -

तांदुळ आणि मक्याचा तुटवडा

दक्षिण कोरियाला कोरोनाच्या संकटकाळात मक्याचे पिक घेण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. दक्षिण कोरियाला येत्या काही दिवसांमध्ये जवळपास १.३५ दशलक्ष टन इतका अन्नधान्याचा तुटवडा जाणवू शकतो. तांदुळ यासारख्या धान्याच्या बाबतीतही मोठ्या प्रमाणात पैसे मोजण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. तर परदेशी चलनाच्या बदल्यातील दरही वाढला आहे. जगभरात सर्वात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा करणाऱ्या राष्ट्रांमध्ये पहिला क्रमांक हा दक्षिण कोरियाचा होता. कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर तत्काळ अशा पद्धतीने दक्षिण कोरियाने लॉकडाऊनची घोषणा केली. पण त्याचे पडसाद हे दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर पहायला मिळाले आहेत. तसेच देशातील अन्नधान्य उपलब्धततेवरही याचा परिणाम दिसून आला आहे. धान्य उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात दर वाढतानाच अनेक ठिकाणी सुपरमार्केट ओस पडल्याचे चित्र या देशात निर्माण झाले आहे.

चीन धावला मदतीला

दक्षिण कोरियातील नेतेमंडळींनीही आता अन्नधान्याच्या तुटवड्याची परिस्थिती कबुल केली आहे. खुद्द किम जोंग उन यांनी सध्याची अन्नधान्य तुटवड्याची भीषण अवस्था जवळून पाहिली आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये त्यांनी वर्कर्स पार्टी ऑफ कोरियाच्या मध्यवर्ती कमिटी बैठक बोलावली होती. त्यामुळेच परदेशातून माल आयात करण्यासाठी आता दक्षिण कोरियाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये चीन आणि दक्षिण कोरियाच्या सीमा भागात मोठ्या प्रमाणात माल वाहून आणणाऱ्या रेल्वेची गाड्यांची वर्दळ वाढल्याचे पहायला मिळत आहे. तसेच दोन्ही देशातील जहाज वाहतूकही वाढल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -