उत्तर सायप्रसचे पंतप्रधान Ersan Saner(५४) यांना एक सेक्स एक्टचा व्हिडीओ लिक झाल्याने राजीनामा द्यावा लागला आहे. तर व्हिडीओतील व्यक्ती मी नसून आपल्याला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचण्यात आल्याचा आरोप सायप्रस यांनी केला आहे.
दोन मुलांचे पिता असलेले सायप्रस गेल्या काही दिवसांपासून राजकीय दबावाखाली वावरत आहेत. त्यांच्या राष्ट्रीय एकता पार्टीने(यूबीपी) सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. तरीही Ersan Saner सध्या सरकारमध्ये आहे. तसेच येऊ घातलेल्या निवडणुकीत जिंकण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. याचदरम्यान, एका माफियाने त्यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह व्हिडीओ लीक केला. ज्यात सायप्रस हस्तमैथुन करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ फेक असल्याचा दावा सायप्रस यांनी केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे त्यांची राजकीय छबीला धक्का बसला आहे.
पण तुर्की माफियांचा यात हात असल्याचा आरोप सायप्रस यांनी केला असून लवकरच यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.