Corona : २०२४ पर्यंत सर्वांना मिळू शकेल कोरोनाची लस; या कंपनीने केला दावा

Corona Vaccine
कोरोना लस

कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात झपाट्याने वाढत असताना त्यावरील लस कधी येते याचीच सगळे वाट पाहत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूवरील लसीवर चाचण्या सुरू आहेत. अशातच २०२४ पर्यंत कोरोनाची लस सर्वांना मिळू शकेल, असा दावा एका नामांकित कंपनीने केला आहे. जगातील सर्वात मोठी लस उत्पादन कंपनी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी २०२४ पर्यंत कोरोना विषाणूवरील लस तयार होणार असल्याचे सांगितले असून ती सर्वांना उपलब्ध होईल असे म्हटले आहे. तसेच त्यांनी भारतातील प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचेल की नाही यावरही शंका व्यक्त केली आहे. फायनॅन्शिअल टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ता अदिर पूनावाला यांनी हे मत मांडले आहे.

काय म्हणाले अदार पूनावाला

पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांना कोरोनाची लस देण्यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. जर एका व्यक्तीमागे कोरोनाच्या लसीच्या दोन थेंबांची गरज असेल, तर संपूर्ण जगातील लोकांसाठी १५ अरब थेंबांची गरज भासणार आहे. त्यांनी भारतातील १.१४ अरब लोकांपर्यंत ही लस पोहोचण्याबाबतही चिंता व्यक्त केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने AZD1222 नावाची कोरोना लस विकसित केली आहे. त्यांनी भारतातील पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला असून कंपनी एक अब्ज लस डोस तयार करणार आहे. २०२१ पर्यंत एक अब्ज लस डोस तयार करण्याचे लक्ष्य आहे. त्याच बरोबर २०२० च्या अखेरीस ४० कोटी डोस तयार होऊ शकतात, असे यापूर्वी सांगण्यात आले होते.

हेही वाचा – 

संसदेतील १७ खासदारांना कोरोना; मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडेंचा समावेश