घरताज्या घडामोडीसर्दी आणि घशातील खवखव म्हणजे 'कोरोना' नाही

सर्दी आणि घशातील खवखव म्हणजे ‘कोरोना’ नाही

Subscribe

सर्दी, खोकला येणे म्हणजे कोरोना संसर्ग नाही.

जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. तर देशात कोरोनाच्या रुग्णांनी पाच लाखाचा आकडा पार केला आहे. यामुळे परिस्थिती फार गंभीर झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तसेच या विषाणूवर लस आणि औषध शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्न देखील करत आहेत. मात्र, अद्याप या कोरोना विषाणूवर कोणतीही लस आलेली नाही. त्यामुळे या विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहेत.

सुरुवातीच्या काळात या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला सर्दी, खोकला, घशात खवखव, ताप येणे आणि दम लागणे अशी लक्षणे दिसून येत होती. त्यामुळे अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या दवाखान्यात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, आता ही लक्षणे देखील बदली आहे. परंतु, लोकांच्या मनातील भीती कायम आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला या लक्षणांमधील घशातील खवखव आणि सर्दी झाल्यास त्या व्यक्तीला कोरोना झाला असावा, असा संशय व्यक्त केला जातो. तसेच त्या व्यक्तीला देखील आपल्याला कोरोना झाला असल्याची भीती वाटते. मात्र, घशातील खवखव आणि सर्दी होणे म्हणजे कोरोना संसर्ग नाही अशी माहिती कानपूरचे ईएनटी सर्जन डॉ. राजीव चित्रांशी यांनी दिली आहे.

- Advertisement -

डॉक्टरांच्या माहितीनुसार; कोरोचा संसर्ग झाल्यास त्या व्यक्तीच्या घशात खवखव होते, सर्दी होते, सर्दीने नाक बंद होत. परंतु, ही लक्षणे वातावरणातील बदलामुळे होतात. अनेकांना पावसाच्या बदलत्या वातावरणामुळे तर अनेकांना अॅलर्जीच्या त्रासामुळे देखील या लक्षणांना सामोरे जावे लागते. त्यामुळे ही लक्षणे दिसली म्हणजे कोरोना आहे, असे समजू नका, असा सल्ला चित्रांशी यांनी दिला आहे.

या गोष्टींचे पालन करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -