घर देश-विदेश स्वप्नात नव्हे प्रत्यक्षात दारूचा पूर, लोकांचे घर भरले मद्याने; कुठे घडला हा प्रकार वाचा-

स्वप्नात नव्हे प्रत्यक्षात दारूचा पूर, लोकांचे घर भरले मद्याने; कुठे घडला हा प्रकार वाचा-

Subscribe

पोर्तुगालमधील साओ लोरेनो डी बैरो येथे रविवारी रेड वाईनची नदी रस्त्यावर वाहू लागली, जी पाहून लोक थक्क झाले.

नवी दिल्ली : काय दारूचा महापूर वाहला असे आपण सहजपणे बोलून जातो. पण असे प्रत्यक्षात घडले आहे. स्वप्नात नव्हे तर खरोखर दारूचा पूर वाहला असून, नागरिकांच्या घरातही दारू वाहून गेली. ही घटना पोर्तुगालच्या साओ लोरेनो डी बैरो येथे घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Not in a dream but in reality a flood of alcohol peoples houses were filled with alcohol Read where it happened)

सविस्तर वृत्त असे की, पोर्तुगालमधील साओ लोरेनो डी बैरो येथे रविवारी रेड वाईनची नदी रस्त्यावर वाहू लागली, जी पाहून लोक थक्क झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लाखो लिटर रेड वाईन रस्त्यावर वाहत आहे. या वाईनच्या पुराचा प्रवाह इतका जोरदार होता की, अनेक घरांचे तळघर देखील रेड वाईनने भरले होते.

उंच टेकडीवरील टाकी फुटल्याने घडला प्रकार

- Advertisement -

रविवारी पोर्तुगालच्या साओ लोरेनो डी बैरोच्या रस्त्यांवर लाखो लिटर रेड वाईनचा पूर आल्याने खळबळ जरी उडाली असली तरी यासंदर्भात अमेरिकन मीडियाने दिले आहे. त्या वृत्तानुसार, 22 लाख लिटरपेक्षा जास्त रेड वाईन असलेली टाकी फुटल्यामुळे रस्त्यांवर रेड वाईनचा प्रवाह दिसत होता. हा प्रवाह जवळच्या नदीकडे वेगाने जाऊ लागल्याने नागरिकांना त्रास झाला होता.

हेही वाचा : TMC खासदार नुसरत जहाँ यांची ईडीकडून ‘या’ प्रकरणात चौकशी सुरू

अग्निशमन दल मदतीसाठी घटनास्थळी

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने शूर्टिमा नदीचे दारूच्या नदीत रुपांतर होण्यापूर्वी कारवाई सुरू केली. रेड वाईनचा प्रवाह जवळच्या शेताकडे नेण्यात आला. लेविरा डिस्टिलरीने या घटनेबद्दल माफी मागितली आहे आणि नुकसान आणि दुरुस्तीच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे.

हेही वाचा : India VS Pakistan: आम्ही बॉम्ब घेऊनच बसलोय का? पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला संताप

आपल्याकडे केली जाते लूट

ही घटना पोर्तुगालमध्ये घडली आहे. पण आपल्याकडे अशी घटना घडली असती तर काय केले असते यावरून चर्चा केली जात आहे. कारण, मागील काही दिवसांपूर्वी आंध्र प्रदेशात हायवेवर बिअरने भरलेला ट्रक उलटल्याने बिअरच्या बाटल्या सर्वत्र पसरल्या. हायवेवर बिअर लुटतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- Advertisment -