घरदेश-विदेशआला नाही गुण; केला डॉक्टरच्या बायकोचा खून!

आला नाही गुण; केला डॉक्टरच्या बायकोचा खून!

Subscribe

डॉक्टराच्या औषधाला गुण येत नसल्याने निराश झालेल्या रुग्णांनी डॉक्टरच्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी रुग्ण आरोपीला अटक करण्यात आली आहे.

अनेकदा बरेच उपचार करुन देखील त्या औषधाला गुण येत नाही. अशावेळी तो रुग्ण हतबल होऊन जातो. त्याला काय करावे हे सुचत देखील नाही. अशावेळी ती व्यक्ती अधिक चिडचिडी होते आणि काहीतरी करुन बसते. अशीच एक घटना मध्यप्रदेशमध्ये घडल्याचे समोर आले आहे. मध्यप्रदेश मधील इंदूर या ठिकाणी आजारपणावर अनेक उपचार करुन देखील गुण न आल्यामुळे त्या रुग्णांनी चक्क डॉक्टरच्या पत्नीचा खून केल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी रुग्ण रफीक रशीद (४५) टुकोगंज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेमके काय घडले?

इंदूर येथील माळवा मिल परिसरात राहणारे रफीक रशीद यांना गेल्या सहा महिन्यांपासन त्वचेचा आजार होता. त्याला सतत शरिराला खाज येत होती. तो अनेक महिन्यांपासून डॉ. रामकृष्ण वर्मा यांच्याकडे उपचार घेत होता. मात्र त्याला उपचारात काहीच यश येत नव्हते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला होता. अनेकदा डॉक्टरकडे जाऊन देखील गुण येत नसल्यामुळे पुन्हा एकदा गुरुवारी डॉ. रामकृष्ण वर्मा यांच्या दवाखान्यात गेला होता. त्या दरम्यान, डॉक्टरांची पत्नी यांनी डॉक्टर घरी नाही आहेत. त्यांना दवाखान्यात येण्यास उशीर होईल‘,असे रफीकला सांगितले. त्यावेळी रफीक म्हणाला, ‘डॉक्टर नसले म्हणून काय झाले तुम्ही माझ्यावर उपचार करा‘. त्यावेळी डॉक्टर यांची पत्नी लता वर्मा आणि आरोपी रुग्ण रफीक यांच्यात वाद झाला. या वादानंतर रफीकने लता यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडाओरड ऐकून त्यांचा मुलगा अभिषेकने लता यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो देखील जखमी झाला असून या हल्ल्यात लता वर्मा यांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

रफीक हा क्लिनिकमध्ये चाकू घेऊनच गेला होता. यावरून पोलिसांना संशय आहे की, तो डॉक्टर वर्मा यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असावा. मात्र, डॉक्टर नसल्याने त्याने त्यांच्या बायकोवर हल्ला केला आहे. रफीक हा खुनाच्या प्रकरणातील आरोपी असून २००५ साली त्याच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -