घरCORONA UPDATEबाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीविरोधातील विधान मागे घेतल्यास, तक्रार मागे घेऊ- IMA

बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथीविरोधातील विधान मागे घेतल्यास, तक्रार मागे घेऊ- IMA

Subscribe

आयएमएने रामदेवांनी पाठवली मानहानीची नोटीस 

अ‍ॅलोपॅथीक ही उपचारपद्धती मूर्ख आणि वैज्ञानिक दिवाळखोरी आहे. असे म्हणणाऱ्या योगगुरु बाबा रामदेव यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. कारण इंडियन मेडिकल असोसिएशन’कडून (IMA) बाबा रामदेव यांच्याविरुद्ध साथरोग कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमधील वाद आणखी वाढले आहे. दरम्यान प्रकरणावर आता आयएमएचे राष्ट्रीय प्रमुख डॉ. जे. ए. जयलाल यांनी आली प्रतिक्रिया नोंदवली आहे. यावर बोलताना डॉ.जे.ए म्हणाले की, आयएमए बाबा रामदेवांविरोधात नाही, परंतु बाबा रामदेवांनी अ‍ॅलोपॅथीक औषधांविरोधात केलेले विधान चुकीचे असून त्यांनी आपले विधान मागे घ्यावे. त्यांनी असे केल्यास आयएमए पोलिसांत त्यांच्याविरोधात केलेली तक्रार मागे घेईल.

“आम्ही बाबा रामदेवाच्या विरोधात नाही”

यावर बोलताना डॉ. जयलाल पुढे सांगतात, आम्ही बाबा रामदेवाच्या विरोधात नाही, परंतु त्यांनी केलेले विधान कोरोना लशीच्या विरोधात आहे. त्यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होत असून गोंधळून टाकणारे आहे. आम्हाला भीती याची जास्त भीती आहे की, की रामदेव बाबांचा फॉलोवर्सचा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या विधानाचा थेट परिणाम लोकांवर होणार आहे.

- Advertisement -

आयएमएने रामदेवांनी पाठवली मानहानीची नोटीस 

रामदेवांनी डॉक्टरांविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी IMA च्या उत्तराखंडातील शाखेने त्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये IMA ने म्हटले की, बाबा रामदेव यांनी आपल्या विधानासाठी पंधरा दिवसाच्या आत माफी मागावी. अन्यशा IMA त्यांच्याविरोधात १००० कोटी रुपयांचा दावा करेल, तर डॉक्टर संघटनांनी अशी मागणी केली आहे की, रामदेव बाबांनी आपल्या विधानासाठी लिखित स्वरुपात माफी मागावी, अन्यथा कायदेशीर पद्धतीने कारवाई करु.

श्वासरी कोरोनिल किटवरीही आक्षेप

IMA ने रामदेव यांच्या पतंजलि कंपनी उत्पादित श्वासरी कोरोनिल किटवरीही आक्षेप नोंदवला आहे. 76 तासाच्या आत कोरोनिल किटबाबतच्या सर्व जाहिराती मागे घ्या. तसेच त्या जाहिरातींमध्ये कोरोना लस घेतल्यानंतर श्वासरी कोरोनिल किट साइट इफेक्टपासून बचाव करतं आणि कोरोनाच्या संसर्गापासून बचावासाठीही प्रभावी आहे. असा दावा करण्यात आला आहे. परंतु IMA ने रामदेव बाबांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर कोरोनिल किटबाबत चुकीचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

Modi Govt 2.0 : कोरोनाविरोधी लढाईत मोदी सरकार अपयशी, परंतु राहुल गांधीपेक्षा मोदीच सरस- सर्वेक्षण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -