बहुमत चाचणीत गैरहजर राहणार्‍या काँग्रेसच्या ९ आमदारांना नोटीस

राज्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेले क्रॉस वोटिंग, बहुमत चाचणीत आमदारांची अनुपस्थिती तसेच औरंगाबाद नामांतरावरून पक्षाच्या हायकमांडने दिलेले आदेश न पाळल्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी नाराज झाले आहेत.

राज्याच्या विधान परिषद निवडणुकीमध्ये झालेले क्रॉस वोटिंग, बहुमत चाचणीत आमदारांची अनुपस्थिती तसेच औरंगाबाद नामांतरावरून पक्षाच्या हायकमांडने दिलेले आदेश न पाळल्यामुळे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी नाराज झाले आहेत. महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाला झालेला दगाफटका, पक्षाविरुद्ध नेत्यांनी केलेले काम माफीयोग्य नसल्याचे पक्षश्रेष्ठींचे मत आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल होतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. (Notice to 9 Congress MLAs who were absent in majority test)

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना २९ मतांचा कोटा ठेवला असतानाही त्यांना केवळ २२ मते पडली. याचा अर्थ काँग्रेसची ७ मते फुटली. या फुटीर आमदारांवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्याकडे केली आहे, तर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे ७ आमदार अनुपस्थित होते. नामांतरच्या विषयावर काँग्रेसच्या मंत्र्यांनी विरोध न केल्यामुळे औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर झाले. त्यामुळे हायकमांड नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

कारवाई करण्याआधी सोनिया गांधी आणि राहुल गांधी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांना दिल्लीत बोलावून त्यांच्याकडून माहिती घेत आहेत. बुधवारी काँग्रेसचे नेते नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली, तर गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीला बोलावण्यात आले. या नेत्यांशी चर्चा करण्यासोबतच दिल्लीहून काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला मुंबईत पाठवून एक अहवाल तयार करण्यात येईल. हा अहवाल हाती आल्यानंतर काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांवर कारवाई होईल अशी शक्यता आहे.


हेही वाचा – शिवसेनेतील गळती थांबवण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रेची घोषणा, महाराष्ट्र पिंजून काढणार