घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोना व्हायरस प्रयोगशाळेत निर्माण नाही झाला; चीनच्या मदतीला WHO

कोरोना व्हायरस प्रयोगशाळेत निर्माण नाही झाला; चीनच्या मदतीला WHO

Subscribe

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि चीन यांच्यादरम्यान आरोप-प्रत्यारोप होत आहेत. कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून पसरला असा आरोप अमेरिकेने केला होता. मात्र आता जागतिक आरोग्य संघटना चीनच्या मदतीला धावली आहे. संभाव्य पुराव्या आधारे कोरोना व्हायरस हा प्राण्यांपासून उत्पन्न झाला असून तो मानवनिर्मित नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यातच चीनच्या वुहान प्रयोगशाळेत अमेरिकेचे शिष्टमंडळ पाठविण्याची मागणी केली होती. डिसेंबर २०१९ मध्ये वुहानच्या प्रयोगशाळेतूनच हा व्हायरस जगभर पसरला अशी शंका अमेरिकेला आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्त्या फडेला चैब म्हणाले की, कोरोना व्हायरस हा प्राण्यांपासून उत्पन्न झाल्याची दाट शक्यता आहे. मात्र तो एखाद्या प्रयोगशाळेत मानवाने निर्माण केल्याची शक्यता कमीच असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

चैब पुढे म्हणाल्या की, कोरोना हा वटवाघुळापासून निर्माण झाला असल्याची शक्यता आहे. मात्र त्याला मानवी शरिरात प्रवेश कसा मिळाला? याचा शोध अद्याप लागलेला नाही. वुहानमधील विषाणू परिक्षण प्रयोगशाळेने देखील याधीच अमेरिकेचा आरोप अफवा असल्याचे सांगितले होते.

ट्रम्प यांनी मागच्या आठवड्यातच संयुक्त राष्ट्र संघाला दिला जाणारा निधी गोठविण्याची भाषा वापरली होती. त्यावर प्रश्न विचारला असता चैब म्हणाल्या की, ट्रम्प यांनी घोषणा केल्यानंतर त्यावर विचार करत आहोत. आम्ही फक्त कोरोना व्हायरसच नाही तर इतर आरोग्य कार्यक्रमावर देखील काम करत आहोत. पोलिओ, एचआयव्ही, मलेरिया अशा आजारांवर जागतिक आरोग्य संघटना आणि संयुक्त राष्ट्र संघाने काम केलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -