घर देश-विदेश आता एअर इंडिया आणखी जोमाने घेणार भरारी; विस्ताराचेही मिळणार बळ, CCI कडून...

आता एअर इंडिया आणखी जोमाने घेणार भरारी; विस्ताराचेही मिळणार बळ, CCI कडून हिरवा कंदील

Subscribe

विलीनीकरणाबाबत सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असे टाटा समूहाने म्हटले आहे.

नवी दिल्ली : काही दिवसापूर्वीच लोगो आणि नाव बदलण्याची घोषणा करणाऱ्या एअर इंडियासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट घडली आहे. ती म्हणजे सीसीआय(CCI) कडून 1 सप्टेंबर रोजी काही अटी आणि शर्थीनुसार टाटा समूहाच्या एअरलाइन्स विस्तारा आणि एअर इंडियाच्या विलीनीकरणास मान्यता दिली आहे. या मंजुरीनंतर, एअर इंडिया देशातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय उड्डाण करणारी एअरलाइन बनणार असून, देशांतर्गत उड्डाणांच्या बाबतीत ती दुसरी सर्वात मोठी एअरलाइन असणार कारण, इंडिगो सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.(Now Air India is going to take it even more vigorously; Expansion will also get strength, green light from CCI)

देण्यात आलेल्या मंजुरीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, CCI ने टाटा SIA एअरलाइन्सचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण आणि सिंगापूर एअरलाइन्स (SIA) द्वारे एअर इंडियामध्ये काही शेअर होल्डिंग घेण्यास मान्यता दिली आहे. या प्रस्तावांतर्गत, टाटा एसआयए एअरलाइन्स लिमिटेड (टीएसएल/विस्तारा) एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन केली जाईल.

मंजुरीआधीच दिली होती कारणे दाखवा नोटीस

- Advertisement -

विलीनीकरणाबाबत सविस्तर माहिती नंतर दिली जाईल, असे टाटा समूहाने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, या मंजुरीपूर्वी सीसीआयने जूनमध्ये एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. स्पर्धेच्या कारणास्तव विस्तारासोबतच्या प्रस्तावित विलीनीकरणाची चौकशी का केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण या नोटीसमध्ये मागितले होते.

हेही वाचा : INDIA alliance : सर्व धागे जुळून एक अतूट वस्त्र निर्माण होत आहे, मात्र…, ठाकरे गटाचा इशारा

अशी असणार भागिदारी

- Advertisement -

टाटा समूहाचे हे पाऊल एव्हिएशन व्यवसायाला बळकटी देण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. विस्तारा आणि एअर इंडिया या दोन्ही टाटा समूहाच्या विमान कंपन्या आहेत. विस्तारामध्ये सिंगापूर एअरलाइन्सची (SIA) 49 टक्के भागीदारी आहे. विलीनीकरणापूर्वी, SIA एअर इंडियामध्ये 25.1 टक्के समभागासाठी 2,059 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यानंतर टाटा सन्सची एअरलाइनमध्ये ७४.९ टक्के भागीदारी असणार आहे.

एप्रिलमध्ये केला होता विलनीकरणासाठी अर्ज

टाटा सन्स आणि एसआयए (SIA) ने यावर्षी एप्रिलमध्ये सीसीआय (CCI) कडे विलीनीकरणाचा अर्ज दाखल केला होता, त्यामध्ये म्हटले होते की, विस्ताराचे एअर इंडियामध्ये प्रस्तावित विलीनीकरणामुळे स्पर्धेवर कोणताही परिणाम होणार नाही. मार्च 2024 पर्यंत विलीनीकरण करारावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : इस्रोची आणखी एक झेप : श्रीहरीकोटा येथून ‘आदित्य-L1’चे यशस्वी प्रक्षेपण

एअर इंडियाचा आकार वाढेल

या विलनीकरणावर सीएपीए (CAPA) चे म्हणणे आहे की, विलीनीकरणानंतर एअर इंडियाचा आकार पुढील सहा वर्षांत वाढेल. याशिवाय, गुणवत्ता आणि जागतिक नेटवर्कमध्येही मोठी सुधारणा अपेक्षित आहे. येत्या काही दिवसांत टाटा एअरलाइन्स जागतिक नाव उंचावण्याच्या दिशेने झेप घेणार आहे.

- Advertisment -