घरदेश-विदेशआता 'बारकोड' सांगणार ट्रेनच्या जेवणाचा दर्जा!

आता ‘बारकोड’ सांगणार ट्रेनच्या जेवणाचा दर्जा!

Subscribe

बारकोडच्या साहाय्याने जेवण ताजं आहे की शिळं? ते किती दिवसांपूर्वी पॅक करण्यात आलं आहे याची माहिती प्रवाशांना बसल्या जागी उपलब्ध होईल.

भारतीय रेल्वेमध्ये मिळणारं जेवण चांगल्या दर्जाचं असतं की नाही? हा जरी वादाचा मुद्दा असला, तरी भारतीय रेल्वेने या जेवणाचा दर्जा ठरवण्यासाठी एक नवीन उपाययोजना लागू केली आहे. नजर असणार आहे. 
‘आयआरसीटीसी’च्या ज्या प्रमुख ३२ किचन्समधून रेल्वे गाड्यांमध्ये जेवण वा अन्य खाद्यपदार्थ पुरवले जातात, तिथूनच ही बारकोड प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या बारकोडच्या साहाय्याने प्रवाशांना मिळणारं खाणं नेमकं कधी पॅक करण्यात आलं याचीही माहिती त्यांना मिळणार आहे. दरम्यान, बारकोड स्कॅन केल्यानंतर प्रवाशांना एखाद्या पदार्थाची गुणवत्ता कमी असल्याचं जाणवल्यास ते त्वरित पँट्री मॅनेजर या टीसीकटडे याची तक्रार करु शकतात.

कसं करणार स्कॅनिंग?

रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी या बारकोड सुविधेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर करु शकतात. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही बार कोड अॅप डाऊनलोड करु शकतात. याशिवाय प्रवासी प्रवासादरम्यान <https://raildrishti.cris.org.in> या वेबसाईटवर जाऊनही बारकोड स्कॅन करु शकतात. बारकोडच्या साहाय्याने जेवण ताजं आहे की शिळं? ते किती दिवसांपूर्वी पॅक करण्यात आलं आहे याची माहिती प्रवाशांना बसल्या जागी उपलब्ध होईल. अलीकडेच रेल्वेने लाँच केलेल्या दृष्टी पोर्टलद्वारे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या माध्यमातून अहमदाबाद, बालासोर, रेनिगुंटा, सियालदाह, कोटा, मुंबई, झांसी, कटिहार, कटपडी  , नोएडा, पुणे, विजयवाडा आदी शहरांमध्ये बनलेल्या बेस किचनचे लाईव्ह फिड बघायला मिळणार आहे. आयआरसीटीसीच्या माध्यमातून अहमदाबाद, बालासोर, रेनिगुंटा, सियालदाह, कोटा, मुंबई, झांसी, कटिहार, कटपडी  , नोएडा, पुणे, विजयवाडा आदी शहरांमध्ये बनलेल्या बेस किचनचे लाईव्ह फिड बघायला मिळणार.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -